Header Ads

कोरोना होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीने होमियोपॅथिक गोळ्याचे वाटपकळंब - शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तथा पर्यटनमंत्री आदीत्य ठाकरे यांनी अवाहन केल्याप्रमाणे अर्सेनिक अल्बम- 30 या होमियोपॅथिक गोळ्याचा डोस देण्यासाठी शिवसेना पक्षाकडुन सूरुवात करण्यात येत आहे. 


संपर्कप्रमुख प्रा. आमदार तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या संयमी व योग्य निर्णयक्षमतेचा अनुभव सध्या राज्याला पाहयला मिळत आहे. त्यांनी केलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्यात अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्याचे वितरण पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. याचा लाभ सर्वसामान्याबरोबरच जेष्ट नागरीक आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अधिक होणार आहे.

 कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी सर्व नागरीकांना हा डोस दिला जाणार आहे. तर कोरोनाच्या संदर्भात जे लोक थेट फिल्डवर काम करत आहेत,  सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत असुन यामध्ये ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना याचा अधिक धोका असल्याचे दिसुन आले आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम -30 या गोळीची शिफारस केलेली आहे.कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सोडुन सगळ्यांचा या गोळ्या दिल्या जाऊ शकतात.  याऔषधाचे कोणतेही दुष्पारिणाम नाहीत, या गोळ्या लहान मुलापासुन ते वृध्द, गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती घेऊ शकतात. 


शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाख लोकांना पहिल्या टप्यात  सहा लाख 75 गोळ्या वितरीत केल्या जाणार आहेत. कोरोना सहाय्यता कक्षामध्ये कर्तव्यावर असलेले कर्मचारी, शिक्षक, या शिवाय पोलीस, होमगार्ड, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवकासह जे जे कोरोनाच्या लढाईत फिल्डवर काम करत आहेत अशा सगळ्यांना या गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. सध्या अनेक गावामध्ये रुग्ण आढळलेले आहेत, अशा सर्वच गावामधील नागरीकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. 


शिराढोण (ता. कळंब) येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब  यांच्या हस्ते गोळ्या वाटुन या उपक्रमाला सूरुवात करण्यात आली आहे.यावेळी आमदार कैलास दादा पाटील,उपविभागीय अधिकारी गाठाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे, पोलीस निरीक्षक जाधव,तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे,बालाजी बप्पा जाधवर,राजेश्वर पाटील पंचायत समिती सदस्य,सरपंच पद्माकर पाटील,डॉ रमेश जाधवर,डॉ चोपडे,नासिर पठाण,सुधीर महाजन,उदय माकोडे,डॉ जोगदंड, उपस्थित होते

No comments