Header Ads

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा 'उस्मानाबाद पॅटर्न'...

Anti Corona Corps (ACC)



उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्याकरीता उस्मानाबाद पोलीस दलाने एक नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणुन जिल्ह्यातील 749 गावांपैकी 706 गावांत ‘ग्राम रक्षक दले’ स्थापन केली आहेत. पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांनी केलेल्या आवाहनावरुन गावातील- ग्राम रक्षक दलातील सुद्रुढ व इच्छुक असे 7,000 पेक्षा जास्त युवक कोरोना वॉरियर्स म्हणुन कार्य करण्यास स्वेच्छेने पुढे आले आहेत. या वॉरियर्सला उस्मानाबाद पोलीस दल प्रात्साहित करीत असुन हे Anti Corona Corps (ACC) पोलीस दलाच्या खांद्यास खांदा लाउन दिवसपाळी- रात्रपाळी असे अहोरात्र आपापल्या गावात, जिल्हा सरहद्दीवर, प्रवेश मार्गांवर स्वेच्छेने कार्यरत आहेत. अशा प्रकारे ते पोलीस बंदोबस्तास हातभार लावत आहेत.



          पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी प्रत्येक पोलीस ठाण्या मार्फत या वॉरियर्सना ओळखपत्रे, लाठी, शिट्टी, टॉर्च,वाटप केली आहेत. प्रथम स्वत: सुरक्षीत राहुन इतरांना सुरक्षीत ठेवता यावे या करीता त्यांना मास्क, सॅनिटायझर, ओडोमॉस इत्यादी आवश्यक वस्तुंचेही वाटप करण्यात आले आहे.
         
 पोलीस अधीक्षक . राज तिलक रौशन यांनी आज दि. 12.05.2020 रोजी कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सोलापूर जिल्हा सिमे लगत असनाऱ्या खडकी, देवकुरुळी, धोत्री ता.तुळजापूर या गावांतील Anti Corona Corps (ACC) यांना भेटून कर्तव्या विषयी मार्गदर्शन करुन “आपली सुरक्षा आपल्या हाती असते हे समजावून त्यांना कामकाजाबाबत सुचना केल्या. दरम्यान खडकी येथे ॲन्टी कोरोना कॉर्प्स (ACC) यांना मास्क, सॅनिटायझर, ग्लुकोज, ओडोमॉस इत्यादी साहित्य वाटप केले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर उपविभाग  दिलीप टिपरसे व पो.ठा. तामलवाडीचे प्रभारी अधिकारी नितीन मिरकर तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.



          सदरचे Anti Corona Corps (ACC) मधील तरुण हे आपापल्या गावांत सुरक्षे विषयी खालील प्रमाणे कार्य करतात.


  •   गावातील नागरीकांमध्ये कोरोना रोगापासून सुरक्षे विषयी जनजागृती करत आहेत.
  •   बाहेर गावाहुन, जिल्ह्यातून, राज्यातून आपल्या गावात ज्या व्यक्ती लॉकडाऊन काळात आल्या आहेत. त्यांची माहिती गावपातळीवरील समितीला देत आहेत.
  •  गावातील होम क्वारंटाईन व्यक्तींवर देखरेख करीत आहेत.
  •   गावातील गरजू व्यक्तींना शासनामार्फत मदत मिळण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
  • पोलीस बंदोबस्तासोबत दिवसपाळी- रात्रपाळी मध्ये हजर राहुन जिल्ह्याची/ गावाच्या सरहद्दीवर संरक्षण करीत आहेत.





पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गावांत कार्यरत असणाऱ्या या Anti Corona Corps (ACC) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments