Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यतील आणखी दोन पॉजिटीव्ह @ ६४ @ 2 मृत्यूउस्मानाबाद  -  जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तो रुग्ण कोंड ( ता. उस्मानाबाद ) येथील रहिवासी आहे. त्यामुळे जिल्ह्यात 
कोरोनामुळे बळींची संख्या दोन झाली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 29.05.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते, पैकी दोघांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. पैकी एकाचा कोंडहुन उस्मानाबादेत येताना मृत्यू झालेला आहे. त्याचा रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. तसेच आज बेडगा ता. उमरगा येथील  एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.


ब्लॅक फ्रायडे 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या इतिहासात शुक्रवारचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला.कोरोनामुळे दोघांचा बळी गेला आहे. पैकी एक रुग्ण बेडगा ता. उमरगा आणि दुसरा रुग्ण कोंड ता. उस्मानाबाद येथील आहे.

बेडगाचा मयत रुग्ण ६७ वर्षांचा तर कोंडचा रुग्ण ६० वर्षांचा आहे. दोघेही मुंबईहुन गावी आले होते. गंभीर बाब म्हणजे बेडगा रुग्णाच्या कुटुंबातील आणखी दोन जण कोरोनाग्रस्त आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे ६४ रुग्ण आढळून आले असून, पैकी १५ जण बरे झाले आहेत तर दोघांचा  मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये ४७ रुग्णावर उपचार सुरु आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

No comments