Header Ads

आणखी पाच जणांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्हउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील आणखी पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात  परांडा कुकडगाव येथील तीन रुग्ण (मुंबई रिटर्न)  कळंब येथील भातशिरपूरा येथील एक (मुंबई रिटर्न )आणि तसेच उमरगा तालुक्यतील  बेडगा येथील एक रुग्ण असा समावेश आहे.आज दुपारीच तीन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटव्ह आलेला होता. आता त्यात पाच जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यत रुग्णाची संख्या ४३ झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण वाढले

 जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26 मे 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी  61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 05 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 11 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

     आज पॉझिटिव्ह आलेल्या पाच रुग्णांपैकी तीन रुग्ण हे परांडा तालुक्यातील कुकडगाव येथील असून त्यांनी मुंबई येथून प्रवास केलेला आहे. एक रुग्ण कळंब तालुक्यातील भातशिरपुरा येथील असून तोही मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. तसेच उमरगा तालुक्यातील  एक रुग्ण बेडगा गावातील असून या व्यक्तीनेही मुंबईतून प्रवास केलेला आहे, असे माहिती डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली आहे.सोमवारपर्यंत जिल्ह्यात ३५ रुग्ण आढळून आले होते. आता मंगळवारी आणखी आठ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. यापैकी एक रुग्ण उस्मानाबाद शहरातील पापनास येथील मध्यमवयीन युवक असून तो मुंबई येथून फार पूर्वीच परतला आहे. विशेष म्हणजे रविवारी आढळून आलेल्या जोशीगल्लीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातही तो आला होता. परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथे दोन रुग्ण आढळले होते. मंगळवारी यात तीनची भर पडली. हे सर्वजण पहिल्याच्या संपर्कातील मुंबईहून परतले आहेत. यासोबत उस्मानाबाद तालुक्यातील तेर, कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा व शिराढोण, उमरगा तालुक्यातील बेडगा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

तेरमधील रुग्णाचा गळा झाला होता लाल

तेर येथे पुण्याहून आलेल्या रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे तेरकराची धाकधूक वाढली आहे. याच्या संपर्कातील आणखी नऊ जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. आठ दिवसांपूर्वी पुणे येथून आण्णाभाऊ साठे नगर तेर येथे आलेल्या पंचेवीस वर्षीय युवकाचे स्वँबचे नमुन्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने तेरकराची धाकधूक वाढली आहे. रविवारी या युवकाच्या घश्यात वेदना होत होत्या. त्याचा घसा लाल होऊन तापही आला होता. यामुळे तो स्वतः हून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

नववधुवर उपचार सुरु 
उमरगा शहरातील तीन, तर तालुक्यातील तीन अशा सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी (ता. २४) रात्री पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये एका नववधूचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २५) नववधूचे नातेवाईक व छोटेखानी लग्नसमारंभाला हजर असलेले मित्रमंडळ अशा आठ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहे. लग्नाचा विधी करणाऱ्या भटजींचा स्वॅबही मंगळवारी तपासणीला पाठविण्यात आला आहे. 


उमरगा तालुक्यात यापूर्वी आढळून आलेल्या दोन बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने ते घरी गेले; पण मुंबई, पुणे या ‘रेड झोन’मधून गावाकडे परतणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढल्याने धोका वाढण्याची शक्यता प्रत्यक्षात खरी ठरली. एका खासगी बसमधून मुंबईहून केसरजवळगात आलेल्या महिलेसह कोथळीच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व पाच जणांवर उमरग्यातील कोविड रुग्णालयात जणांवर उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत ४३ रुग्ण आढळून आलेले आहेत. पैकी आठ जणांना डिस्चार्ज  देण्यात आला आहे.विशेष म्हणजे डिस्चार्ज  देण्यात आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३५ रुग्णावर उपचार सुरु आहेत. 

 उमरगा - ९, कळंब -९, परंडा -९, लोहारा- ५, उस्मानाबाद - ५, वाशी -३, भूम - २, तुळजापूर - १  अशी तालुकानिहाय संख्या आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण पसरले आहे.    

1 comment