Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सहाची भरउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात परंडा १, वाशी १, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असा समावेश आहे.


 गुरुवारी सकाळी शिराढोण  येथील एक महिला आढळून आली होती मात्र ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी १७ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले असून, पैकी चार  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्यस्थितीत 20 रुग्ण आहेत.
उस्मानाबादेतील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

उस्मानाबाद शहरात धारासूर मर्दिनी रोड भागातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती, दरम्यान या तरुणाच्या संपर्कातील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे.


जिल्ह्यात एकूण 13 कोविड पॉझिटिव्ह  रुग्णावर उपचार 

 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 21.05.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील एकूण 74 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 63 व्यक्तींचे  अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व 02 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत व 03 व्यक्तींचे अहवाल इनकन्ल्कुजीव आहेत.

           या सहा कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 वाशी, 4 जेवळी व 1 परांडा येथील आहे. तसेच शिराढोण ता. कळंब येथील रुग्ण लातूर येथे गेले असता तेथे स्वॅब तपासणीचा अहवाल पॉजिटिव्ह आला असून तेथेच सदरील रुग्णाचा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे उपचार चालू आहेत. तसेच शिराढोण साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू असून तेथे   कंन्टेटमेंट झेान जाहीर करण्याते आला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 इतकी झाली असून यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 20 इतकी असून  उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 इतकी आहे, असे डॉ. आर. व्ही. गलांडे जिल्हाशल्यचिकित्सक यांनी सांगितले आहे.

2 comments

Unknown said...

Alur tq Omerga dist Osmanabad live updates on corona virus plzz ......

Jivan Dolare said...

राज्य सरकार जवाबदार आहे पुणे मुंबई ची लोक गावी येत असल्यामुळे आकडे वाढत आहेत त्यांना पुणे मुंबई म्हध्ये थमबुनच टेस्ट करून गावी पाठवले पाहिजे