उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्हउस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील आज आणखी दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता २९ झाली असून पैकी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  डिस्चार्ज   देण्यात आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आल्याने सद्यस्थितीत २४  रुग्ण उपचार घेत आहेत.


आज कोरोना पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये मुरूम ता. उमरगा येथील एक २३ वर्षाचा मुलगा आहे. तो पुण्यावरून गावी आला होता. तसेच कळंब तालुक्यातील शिरढोण मधील एक ८० वर्षाची वृद्ध महिला आहे. तिच्या घरातील काही जण लातूरमध्ये कोरोना पॉजिटीव्ह असल्यामुळे उपचार घेत आहेत.


दोन दिवसांपुर्वी शिराढोण गावातील एक महिला लातूर शहरात उपचारासाठी गेली होती. मात्र सदर महिला मुंबई येथून काही दिवसांपूर्वी परतली होती. त्यामुळे महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले होते. रुग्ण महिलेच्या ८० वर्षीय सासुचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.\

कोरोना : मुरूमजवळील कोथळी गाव सील

मुरुमजवळील कोथळी येथील एक २३ वर्षीय युवक देखील पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील नागरिकांचाही शोध घेण्याचे काम सुरु आहे. हा युवक पुणे शहरातून दहा मे रोजी कोथळी गावी आला होता. ताप आल्याने त्याला शुक्रवारी (ता. २२) मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्हयातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तीचे अहवाल  Inconclusive आले आहेत आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार १५८ जणांना क्वारंटाईन  करण्यात आले असून पैकी  ३ हजार ४५३ जणांना होम क्वारंटाईन  तर १७०५ जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. 

   

No comments