चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण सापडले

 
उस्मानाबाद जिल्ह्यत कोरोना रुग्णाची संख्या १३ : रेडझोनकडे वाटचाल 


चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण सापडले


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णाच्या संख्येत एकदम  सहाने वाढ झाली असून एकूण संख्या १३ झाली आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे यापूर्वी सात रुग्ण होते. त्यात  19 मे रोजी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट मध्ये सहा जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. मुंबई पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत , या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारनटाईन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 जण, भूम तालुक्यातील गिरवलीचा 13 वर्षाचा एक मुलगा , उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण, तुळजापूरची 1 महिला यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  विशेष म्हणजे वरीलपैकी तुळजापूरची महिला पुण्यावरून आली असून इतर सगळेजण हे मुबंई वरून आलेले आहेत.उस्मानाबाद जिल्हयात आल्यानंतर वरील सर्व 6 जणांना क्वारंटाईन केले होते.



उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागात असलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली असून तो तरुण मुंबई येथून सोलापूर पर्यंत खासगी जीपने त्याच्या आईसह 5 जणसोबत आला व त्यानंतर सोलापूरहुन 20 किमी पायी चालत हे आई व मुलगा उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आले व नंतर त्याचा भाऊ त्यांना दुचाकीवर उस्मानाबाद शहरात घेऊन आला. या रुगणाला अगोदर पासूनच ब्लड कॅन्सर असून त्यात कोरोना ही बाब चिंताजनक आहे. या तरुणाच्या घरी 12 जण असून इतर 7 असे 19 जण हायरिस्क संपर्कात आहेत.

तुळजापूर शहरातील 21 वर्षीय महिला ही पुणे येथून आली असून ती 6 महिन्याची गरोदर माता आहे त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, भोसले गल्लीत राहणाऱ्या या महिलेच्या संपर्कात 12 जण आले आहेत. भूम येथील 13 वर्षीय मुलगा हा मुंबई येथून आला असून त्याची बहीण मुंबई येथे पॉझिटिव्ह सापडली असून आई नर्स आहे. हा मुलगा वडिलांसोबत गावी आला असून त्याला शाळेत ठेवण्यात आले होते, याच्या संपर्कात 2 जण आहेत अशी माहिती गलांडे यांनी दिली.


परंडा तालुक्यातील 2 रुग्ण हे भूम तालुक्यातील रुग्णाच्या सोबत प्रवास करून आले होते त्यांच्या संपर्कातील 7 जण हायरिस्क आहेत.लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्ण कांदिवली मुंबई येथून आला असून त्याच्या संपर्कात 6 जण आले आहेत. या सर्व 6 रुग्णावर उपचार करण्यात येणार असून संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. कळंब येथील महसूल विभागाच्या कर्मचारी असलेल्या रुग्णाला अगोदरच किडनीचा त्रास असल्याने त्याची स्तिथी चिंताजनक बनली आहे.

हा लेख नक्की वाचा 

उस्मानाबाद जिल्हा : रेड झोनकडे वाटचाल !


पाहा व्हिडीओ 





From around the web