वाईट बातमी : लाइव्ह पिटूसी करणे रिपोर्टरला पडले महागात

अडीच वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू 


उस्मानाबाद - ई टीव्ही भारतच्या उस्मानाबादच्या रिपोर्टरला  एका न्यूजसाठी लाइव्ह पिटूसी करणे खूप महागात पडले आहे. त्याला आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला यामुळे मुकावे लागले आहे.  या दुर्दैवी घटनेबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केले आहे.


सध्या कोरोना विषाणूची साथ आहे. अश्या  बिकट परिस्थितीमध्ये सर्व चॅनल्स आणि वृत्तपत्राच्या रिपोर्टरना  पोटा -पाण्यासाठी  जीव मुठीत धरून काम  करावे लागत आहे. ई- टीव्ही भारतचा उस्मानाबाद रिपोर्टर कैलास चौधरी हा  प्रामाणिक काम करणारा  पत्रकार. त्याला न्यूजसाठी लाइव्ह पिटूसी करणे खूप महागात पडले.

घडले असे की, ई टीव्ही भारतच्या असाइनमेंट नुसार कैलास चौधरी हा बुधवारी दुपारी आपल्या घराच्या गच्चीवर एका न्यूजसाठी लाइव्ह  पिटूसी करीत होता. ऑफिसने दिलेला मोझो (मोबाईल) द्वारे त्याची पत्नी चित्रिकरण करीत होती . खाली त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा कैवल्य खेळत होता. खेळत - खेळत तो घराच्या आवारातील अंडरग्राउंड पाण्याच्या हौदात जावून पडला. १५ मिनिटानंतर चौधरी पती -पत्नी खाली आले तर त्यांचा मुलगा दिसेनासा झाला. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली, शेवटी संशय आल्याने पाण्याच्या हौदात पाहिले तर मुलगा कैवल्य  पाण्यात बुडून मृत झाला होता.

कैवल्य 


कैलास चौधरी हा  मूळचा लोहारा तालुक्यातील  हिप्परगा ( रवा) येथील रहिवासी. तो  उस्मानाबादमध्ये भाडोत्री घरात राहत होता.   उस्मानाबादला ही दुर्दैवी घटना घडली . चौधरी यास लग्नानंतर पहिला मुलगा झाला होता. त्यास  हा एकुलता एक मुलगा, तोही गमावला.  या घटनेबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त  केले  आहे.  उस्मानाबाद लाइव्ह कैलास चौधरी याच्या दुःखात सहभागी आहे. 

4 comments

जयभिम कांबळे said...

आम्हीही दुःखद सहभागी आहे

mitramajha said...

अत्यंत वाईट घटना...

Unknown said...

अत्यंत वाईट वाटले आम्हीही दु:खात सहभागी आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

Unknown said...

Allah aapko himmat de aameen