Header Ads

क्वारंटाईन इसमांचा निष्काळजीपणा- 2 गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हा: 1)इरफान बाशुमियॉ शेख 2)आरीफ गुलमहंमद शेख 3)आदीक शेख 4)यजाज रहीम बागवान 5)दिलदार महमद शेख 6)मरगु शंकर पवार सर्व रा. मंगरुळ, ता. तुळजापूर यांना मौजे मंगरुळ येथील जि.प.शाळेत क्वारंटाईन केलेले होते. क्वारंटाईन असतांनाही त्यांनी दि. 22.05.2020 रोजी क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता एकत्र जमुन, एकमेकांत सुरक्षीत अंतर न ठेवता निष्काळजीपणाचे कृत्य केले.
तर, लॉकडाऊन काळात विनापरवाना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असतांनाही प्रदीप मल्लिनाथ कांबळे रा. कोथळी, ता. उमरगा हे आडवाटेने, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदी टाळून प्रवास करत उस्मानाबाद जिल्ह्यात येउन प्रशासनास न कळवीता कोथळी येथील त्यांच्या शेतात राहीले. तसेच दि. 24.05.2020 रोजी कोथळी येथे सार्वजनिक ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता वावर करुन निष्काळजीपणाची कृत्य केले. त्यांच्या या कृत्याला कुटूंबातील सदस्यांनी सहकार्य केले.  यावरुन वरील नमुद व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.लॉकडाउन: दि. 23.5.2020 रोजी 107 पोलीस कारवायांत 34,800/-रु. दंड वसुल.

उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 51 कारवायांत- 10,200/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 14 कारवायांत- 7,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 13 कारवायांत 2,600/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे:  1 कारवाईत 1,000/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
5)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 28 कारवायांत 14,000/- रु. दंड प्राप्त झाला आहे.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 51 वाहने जप्त.”

उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन असतांनाही दि.23.05.2020 रोजी जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन वाहनासह रस्त्यावर येणाऱ्या व्यक्तींची परंडा पो.ठा.- 15, कळंब पो.ठा.- 36 अशी एकुण 51 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments