विद्यार्थी जमवून क्लास घेतला, क्लास चालकावर गुन्हा दाखल


 तुळजापूर: राहुल शहाजी बोबडे रा. पापनास नगर, तुळजापूर यांनी दि. 23.05.2020 रोजी 12.00 वा. पापनास नगर, तुळजापूर येथे आपल्या विवेकानंद कोचींग क्लासेस मध्ये विद्यार्थी एकत्र जमवून गर्दी निर्माण केली. अशा प्रकारे त्यांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाची अवज्ञा करुन निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन पो.ठा. तुळजापूर येथील सपोनि- श्री. गणपत राठोड यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारीवरुन राहुल बोबडे यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण.”

 नळदुर्ग: मारुती दत्ता कांबळे रा. गुळहळळी, ता. तुळजापूर यांनी गावातीलच- तानाजी रधुनाथ घोडके यांच्याकडून हात उसणे पैसे घेतले होते. सदर पैसे मागण्यासाठी दि. 21.05.2020 रोजी 15.00 वा. सु. गुळहळळी शिवारात तानाजी घोडके यांनी शिवराम हालकंबे, राजेंद्र हालकंबे, गुंडूपाशा पटेल, अरविंद पाटील सर्व रा. गुळहळळी  यांच्या सहाय्याने बेकायदेशीर जमाव जमवून मारुती कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, कंबर पट्ट्याने मारहाण केली. तसेच मारुती यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना जखमी केले.
अशा मजकुराच्या मारुती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 22.05.2020 रोजी नोंदवला आहे.


उस्मानाबाद  मधुकर अंबादास ठवरे रा. देवकते गल्ली, उस्मानाबाद हे दि. 22.05.2020 रोजी 19.00 वा. सु. विजय चौक, उस्मानाबाद येथे फळे विकत घेण्याकरीता गेले होते. यावेळी दादा भागवत घोरपडे, दादा मोरे, राहुल मोरे, विनोद गिड्डे सर्व रा. जुनी गल्ली, उस्मानाबाद यांनी पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून मधुकर ठवरे यांना काठीने मारहाण करुन जखमी केले. मारहाण सोडवण्यास आलेल्या कमलाकर ठवरे यांनाही वरील व्यक्तींनी काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या मधुकर ठवरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.05.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार अड्ड्यावर छापे.”
 ढोकी: विलास डोलारे, श्रीकांत ढावारे, नितीन देशमुख, राम आदमाने, श्रीराम कसबे, विनायक ढवारे, अविनाश ढवारे, फरिद तांबोळी, खुर्शीद आवटी सर्व रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे सर्व दि. 22.05.2020 रोजी ढोकी शिवारातील माणिक आवटे यांच्या शेतात तिरट जुगार खेळतांना जुगाराचे साहित्यासह रोख 1,320/-रु. च्या मालासह पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन नमुद सर्वांविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा नोंदवला आहे.


No comments