उस्मानाबाद जिल्हा : दोन आरोपींकडून चोरीच्या दोन गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त


उस्मानाबाद - शौकत महेबुब तांबोळी रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांच्या येडशी ऑटोरीक्षा स्थानकाजवळील ‘तांबोळी पान स्टॉल’ मधील स्काय वर्थ कंपनीची एलईडी (कि.अं. 11,500/-रु.) ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने पो.ठा. उस्मानाबाद ग्रामीण गुन्हा.र.क्र. 120/202 दाखल आहे. तर, बालाजी अरुण मसे रा. सारोळा (बु.), ता. उस्मानाबाद यांच्या बारपेळवाडी येथील शेत तळ्यातील लक्ष्मी कंपनीची 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप (किं.अं.9,500) अज्ञात चोरट्याने चोरल्यावरुन. गु.र.क्र. 123/2020 दाखल आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- 1)सिद्राम पोपट पवार रा. वरुडा पारधी पिढी 2)सुरेश चंदर काळे रा. जुना बस डेपो, उस्मानाबाद या दोघांना ताब्यात घेउन उपरोक्त दोन्ही गुन्ह्यांमधील चोरीस गेलेला माल एलईडी टीव्ही व पानबुडी विद्युत पंप दोघांच्या ताब्यातून जप्‍त करण्यात आला आहे. उर्वरीत तपासकामी दोघा आरोपींना पो.ठा. उस्मानाबाद ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, पोकॉ- पांडुरंग सावंत यांच्या पथकाने केली आहे.    


                     अटक आरोपीच्या ताब्यातून चोरीची स्कुटर जप्तउस्मानाबाद -  आरोपी- आकाश प्रल्हाद काळे रा. शिंगोली तांडा, ता. उस्मानाबाद यास पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकुन चार वर्षापूर्वी चोरी केलेली एक मोटारसायकल त्याच्या कडून यापूर्वीच जप्त केली आहे. त्याच आरोपीकडून पो.ठा. उस्मानाबाद शहर गु.र.क्र. 186/2020 या गुन्ह्यात चोरलेली हिरो प्लेजर स्कुटर क्र. एम.एच. 25 एए 2980 (किं.अं. 20,000/-रु.) दि. 16.05.2020 रोजी जप्त करण्यात आली आहे.
 ही कारवाई स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, सपोफौ- बाळासाहेब खोत, पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, पोना- अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, यांच्या पथकाने केली आहे. 

No comments