छुप्या मार्गाने विनापरवाना जिल्हा प्रवेश, 2 गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश बंद आहे. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छूप्या मार्गाने, आडवाटेने विनापरवाना जिल्ह्यात लोक येत आहेत. 1)लक्ष्मण गिडीबा सुकळे 2)साखराबाई लक्ष्मण सुकळे दोघे रा. कात्राबाद, ता. परंडा हे दोघे पती- पत्नी दि. 08.05.2020 रोजी पुणे येथून मौजे कात्राबाद येथे आले. तर, 3)प्रशांत नवनाथ दहीरे रा. हिंगणगांव, ता. कळंब हे दि. 08.05.2020 रोजी भिवंडी येथुन हिंगणगांव येथे आले व आपापल्या गावात नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरुन मानवी जिवीत धोक्यात येईल अशी कृती केली. अशा प्रकारे त्यांनी कोरोना- लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन संबंधीत गावच्या पोलीस पाटील/ ग्रामसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्य्क्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 3 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, मुरुम: लॉकडाउन काळात सार्वजनिक ठिकाणी तोंडास मास्क लावन्याचे आदेश असतांनाही 1)अजित भालेराव 2)गणेश धनेराव 3)दिपक भालेराव 4)सागर भालेराव सर्व रा. सालेगाव, ता. लोहारा हे दि. 08.05.2020 रोजी मौजे येणेगुर येथे एकाच मोटारसायकलवर चौघे बसुन नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले. यावरुन वरील चौंघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, मोटार वाहन कायदा कलम- 3 (1), 181, 128/ 177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 9 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन असतांनाही दि. 08.05.2020 रोजी जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन वाहनासह रस्त्यावर येणाऱ्यांची परंडा पो.ठा.- 8, तामलवाडी- 1, अशी एकुण 9 वाहने ताब्यात घेतली आहेत.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.

1) भारत राजेराव पवार रा. जुनी दुध डेअरी, कळंब हा दि. 09.05.2020 रोजी जुनी दुध डेअरी येथे अवैध गावठी दारु निर्मीती करत असतांना बॅरल मध्ये 3,600 ली. द्रवपदार्थ साहित्यासह किं.अं. 1,51,500/-रु. व दारु वाहतुकीसाठी महिंद्रा पिक अप वाहन बाळगलेला असतांना तर याच दिवशी अशोक मधुकर काळे रा. कल्पना नगर, पारधी पिढी, कळंब हा त्याच्या घरा जवळ अवैध गावठी दारु निर्मीतीचा 200 ली. द्रव पदार्थ व 20 ली. गावठी दारु एकत्रीत किं.अं. 9,500/-रु. बाळगला असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला.

2) सुभाष चव्हाण रा. शिवाजीनगर तांडा, दाळींब, ता. उमरगा हा दि. 08.05.2020 रोजी स्वत:च्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 1,050/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला.
यावरुन वरील सर्वांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments