जनावरांची निर्दयीपणे व बेकायदेशीर वाहतुक, गुन्हा दाखलनळदुर्ग: लॉकडाउन काळात नळदुर्ग पो.ठा. अंतर्गत खानापूर येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. दि. 17.05.2020 रोजी 02.00 वा. चेकपोस्ट वर आयशर मिनी ट्रक क्र. एम.एच. 13 एएक्स 4050 आला. त्याच्या पुढील काचेवर ‘अत्यावश्यक वस्तु वाहतुक व पुरवठा’ असा कागद चिकटवलेला होता. चेकपोस्टवरील पोउपनि- श्री. अशोक पिंपळे व पोलीस पथकास संशय आल्यावरुन सदर वाहनाची तपासणी करण्यात आली. यात वाहनात गोवंशीय व म्हैस अशी लहान मोठी एकुण 31 जनावरे दाटीवाटीने कोंबून बांधुन कत्तलीसाठी, मांस विक्रीसाठी वाहुन नेत असल्याचे आढळले. यात चिकटपट्टी गुंडाळुन काही जनावरांचे तोंड बांधण्यात आले होते. पोलीसांनी त्या जनावरांची मुक्तता करुन 1)असिफ यासीन कुरेशी, 2)अबु फिरोज कुरेशी दोघे रा. मोहोळ, सोलापूर 3)वाहनाचा अज्ञात चालक अशा तिघांविरुध्द प्राण्यांना क्रुरपणे वागवण्यास प्रतिबंध कायदा सह, प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवला आहे.

ग्राहकांची गर्दी जमवली मांस विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
 तुळजापूर: मंगेश रमेश क्षिरसागर व अमोल अरुण गोलप दोघे रा. तुळजापूर यांनी दि. 17.05.2020 रोजी 10.00 वा. तुळजापूर येथील त्यांच्या ताब्यातील अनुक्रमे ‘तुळजाभवानी मटन शॉप’ व ‘जगदंबा मटन शॉप’ येथे ग्राहकांत सुरक्षीत अंतर न राखता त्यांची गर्दी निर्माण करुन व्यवसाय केला. यावरुन त्या दोधांविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments