पोलीस चेकपोस्टच्या अडथळयांस वाहनाची धडकतामलवाडी: तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उस्मानाबाद- सोलापूर जिल्हा सिमेवर लॉकडाउन काळात नाकाबंदी करीता राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या पोलीस चेकपोस्टच्या ठिकाणी वाहने चौकशी करीता थांबावीत याकरीता अडथळे (बॅरीकेड्स) रस्त्यावर ठेवण्यात आले आहेत. दि. 13.05.2020 रोजी 11.00 वा. प्रकाश वाघमारे रा. नांदेड यांनी ट्रक- टँकर क्र. एम.एच. 26 बीइ 0775 हा निष्काळजीपणे चालवून सदर अडथळ्यांना धडक देउन शासनाचे अंदाजे 20,000/- रु. चे नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या सचिन वारे, पोलीस कॉन्स्टेबल यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद चालकाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.
 तामलवाडी: लॉकडाउन काळात सार्वजनिक ठिकाणी तोंडास मास्क लावन्याचे आदेश असतांनाही 1)राम महादेव कदम त्यांच्या सोबत अन्य्‍ एक व्यक्ती दोघेही रा. तामलवाडी, ता. तुळजापूर हे दि. 13.05.2020 रोजी मौजे तामलवाडी येथे एकाच मोटारसायकलवर बसून मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरतांना पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळले. यावरुन वरील दोघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 186, 269, 270 सह, कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments