Header Ads

नळदुर्ग : गुटखा बाळगला, गुन्हा दाखलनळदुर्ग: मुनिर फकीरसाब शेख रा. किल्लागेट, नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 22.04.2020 रोजी नळदुर्ग येथे पोलीस नाकाबंदी दरम्यान गोवा गुटखा चे 15 पोते एकुण किं.अं. 1,05,000/- रु. चा माल शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ इंडीका कार क्र. एम.एच. 25 ए 3037 मध्ये अवैध वाहुन नेत असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले. अशा प्रकारे वरील व्यक्तीनी शासन प्रतिबंधीत अन्नपदार्थ बाळगल्याने तो माल जप्त करण्यात आला. सदर पदार्थ हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ असल्याची खात्री करुन अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपी विरुध्द गुन्हा दि. 05.05.2020 रोजी दाखल करण्यात आल आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, वाशी: तानाजी दातखिळे, भिमराव दातखिळे, द्रौपती दातखिळे, बालाजी दातखिळे सर्व रा. कारंडी बेलगांव, ता. भुम यांनी भाउबंद-बाळासाहेब मारुती दातखिळे यांना दि. 04.05.2020 रोजी 20.30 वा. सु. कारंडी बेलगांव येथील त्यांच्या शेतात सामाईक विहीरीतील खारपण शेतात टाकण्याच्या कारणावरून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारुन बाळासाहेब यांना जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाळासाहेब दातखिळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 05.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: राम राजेंद्र बंडगर रा. नागोबा गल्ली, मुरुम, ता. उमरगा यांना दि. 05.05.2020 रोजी 16.30 वा. सु. सिधय्याप्पा मंदीर जवळ, मुरुम येथे रहदारीच्या कारणावरुन कॉलनीतील- विश्वनाथ लामजाने, आप्पाराव लामजाने यांनी शिवीगाळ करुन, कुदळीने डोक्यात वार करुन जखमी केले. राम बंडगर यांची आई भांडणे सोडवण्यास आल्या असता त्यांनापण वरील दोघांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राम बंडगर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 05.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
चोरी.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): प्रशांत कैलास धुमाळ रा. वैराग नाका, उस्मानाबाद यांच्या घरा समोर बांधलेल्या खिल्लार जातीची गाय कि.अं. 25,000/-रु. व शेजारी- शंकर रंगनाथ देवकते यांची एक गाय किं.अं. 15,000/-रु. ची दि. 04.05.2020 रोजी मध्यरात्री ऋषीकेश बाळु कांबळे उर्फ बाळु रा. फकीरानगर, उस्मानाबाद याने चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या प्रशांत धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतावर गुन्हा दि. 05.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments