नळदुर्ग : विहिरीत पोहण्यावरून एकाचा खूननळदुर्ग: रणजीत भोईटे रा. किलज, ता. तुळजापूर यांचा विहीरीत पोहतांना गावातीलच भाऊबंदांशी वाद झाला होता. दि. 18.05.2020 रोजी 11.00 वा. रणजीत भोईटे हे गावातीलच आपल्या शेतात भाऊ- रोहीत, पिता- रघुनाथ , आई- रागीणी यांच्यासह काम करत होते. यावेळी बाळु भोईटे, शंकर भोईटे, नागनाथ भोईटे, आशाबाई भोईटे, सुरज भोईटे, सुधीर भोईटे, धनश्री भोईटे यांनी रणजीत भोईटे काम करत असलेल्या शेतात जाउन विहीरीतील पोहतांना झालेल्या भांडणाचा वाद उकरुन काढून रणजीत भोईटे व कुटूंबीयांस शिवीगाळ करुन, दगड फेकून मारुन व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत फेकलेला दगड रघुनाथ भोईटे, वय 48 वर्षे, यांच्या डोक्यात लागुन जखमी होउन ते बेशुध्द झाले. तर रणजीत भोईटे स्वत: त्यांचा भाऊ-रोहीत, आई- रागीणी असे जखमी झाले. हा प्रकार पाहुन आकाश भोईटे व प्रशांत भोईटे यांनी मारहाण सोडवली. जखमी रघुनाथ यांस मोटारसायकलवर सलगरा (दि.) येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले.  अशा मजकुराच्या रोहीत भोईटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ करणावरून मारहाण

 भुम: संदीप शहाजी सोनवणे व शहाजी सोनवणे दोघे रा. चिंचपुर (ढगे), ता. भुम यांना दि. 08.05.2020 रोजी व दि. 17.05.2020 रोजी 13.00 वा. सु.त्यांच्या घरा समोर व चिंचपुर नदीकाठच्या गावठान शिवारात गावातीलच- गणेश संजय कवाळे व अन्य 20 व्यक्तींनी कुंपननलीका (बोअर) चालू करण्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथाबुकक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मुरुम: फुलचंद सोमा राठोड रा. शास्त्रीनगर तांडा, दाळींब, ता. उमरगा हे दि. 15.05.2020 रोजी मौजे दाळींब येथील त्यांच्या शेतात होते. यावेळी गावातीलच शेतशेजारी- शेषेराव लक्ष्मण चव्हाण हे सामाईक बांधावरील झाड तोडत होते. फुलचंद राठोड यांनी त्यांना त्याबाबत विचारणा केली असता शेषेराव चव्हाण व अमोल चव्हाण या दोघां पिता- पुत्राने फुलचंद राठोड यांना शिवीगाळ करुन, कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फुलचंद राठोड यांच्या फिर्यादीवरुन नमुद पिता- पुत्रांविरुध्द गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद- अमोल सुरेश सुर्यवंशी रा. सांजा, ता. उस्मानाबाद व भाउ- सचिन या दोघांना दि. 16.05.2020 रोजी 19.00 वा. सु. सांजा येथील गणपती मंदीर जवळ भाऊबंद- शंकर सुर्यवंशी, सुदर्शन सुर्यवंशी, सोहम सुर्यवंशी, कृष्णा सुर्यवंशी यांनी रहदारीच्या - जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अमोल सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments