Header Ads

दारू पिण्याचा परवाना मागण्यासाठी २०६६ अर्ज

सरकारला १ लाख ३ हजार ३०० रुपये महसूल प्राप्त उस्मानाबाद -  लॉकडाऊनच्या काळात उस्मानाबाद  जिल्ह्यात दारू विक्री दुकाने बंद होती, आता दोन महिन्यानंतर दारू विक्री सुरु झाल्यानंतर दारू पिण्याचा परवाना मागण्यासाठी जिल्ह्यात दोन हजार ६६ अर्ज दाखल झाले आहेत. पैकी ८८५ अर्ज मंजूर करण्यात आले असून, १०८२ अर्ज प्रलंबित आहेत.
त्यातून शासनास १ लाख ३ हजार ३०० रुपये महसूल प्राप्त झाला आहे.\
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ऑनलाईन दारू पिण्याचे परवाने सद्यस्थिती

(साधारणपणे मागील तीन वर्षांची स्थिती )


दिनांक 1/4/17 ते दिनांक 17/5/2020
एकूण अर्ज प्राप्त=256
एकूण मंजूर अर्ज =249
एकूण प्रलंबित अर्ज =3
एकूण महसूल प्राप्त=12800/-

(फक्त लॉक डाउन काळातील चार दिवसांची स्थिती दि 18 ते 21मे2020)

एकूण अर्ज प्राप्त=2066
एकूण मंजूर अर्ज =885
एकूण प्रलंबित अर्ज =1082
एकूण महसूल प्राप्त=103300/-

No comments