Header Ads

लॉकडाऊन : लातूर पॅटर्नचा आदर्श उस्मानाबाद घेणार का ?


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात  कोरोनाचा एकही  रुग्ण  सापडलेला नाही. हा जिल्हा  ग्रीन झोन आहे. असे असताना, लॉकडाऊन ३ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ सोमवार, बुधवार आणि  शुक्रवार हे तीन दिवस दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे,त्यामुळे लोकांची गर्दी होऊन उलट धोका निर्माण झालेला आहे. त्याऐवजी लातूर पॅटर्न राबवला तर योग्य होईल, असे अनेकांचे मत आहे. 

लातूर जिल्हा रेड झोन मध्ये आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर मध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या २५ पर्यंत गेली आहे. तरीही लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एक पॅटर्न राबवला आहे , त्यांनी  हॉस्पिटल, मेडिकल, आरोग्य विषयक सेवा  दुकाने २४ तास, भाजीपाला आणि किराणा दुकाने दररोज तर अन्य दुकाने रोटेशनप्रमाणे तेही सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत उघडण्यास परवानगी दिलेली आहे, तसेच सलूनला घरपोच सेवा देण्यास बजवाले आहे. शैक्षणिक बाबतीत लातूर पॅटर्न गाजला होता,आता कोरोना लॉकडाऊन पॅटर्न गाजत आहे.  लातूर पॅटर्नचा हा  आदर्श उस्मानाबाद घेणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 

काय आहे लातूर पॅटर्न पाहा !


लातूर जिल्हाधिकारी यांचा आदेश पाहा 


2 comments

Unknown said...

Very nice

Gajanan Sable said...

पेशंट संख्या बघा दोन्ही जिल्ह्याची अन मग कोण कुणाचा आदर्श घ्यायचा ते सांगा..