कळंब तालुक्यातील पाथर्डी गाव सील

 
खासदार ओमराजे यांची गावास भेट

कळंब तालुक्यातील पाथर्डी गाव सील

कळंब - तालुक्यातील पाथर्डी येथे कोरोना बाधित दोन रुग्ण आढळल्याने हे गाव प्रशासनाने सील केले आहे. दरम्यान या  गावास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट देऊन आवश्यक त्या उपायोजना कराव्यात, रुग्णांवर स्थानिक पातळीवर तातडीने उपचार व्हावेत, अश्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

धक्कादायक : कळंब तालुक्यातील तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह



मुंबईहुन  पाथर्डीमध्ये आलेले पती - पत्नी कोरोना पॉजिटीव्ह निघाल्यानंतर या गावात खळबळ उडाली आहे. गावात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळताच प्रशासनाने खबरदारी घेत गावाच्या सीमा सील केल्या आहेत. सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.

पाहा व्हिडीओ 




दरम्यान, या गावास खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी भेट देऊन शासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.



पुणे- मुंबई वरून आलेल्या व्यक्तींना १४ दिवस शाळेत राहण्यासाठी व्यवस्था करावी व त्यांचे भोजन व्यवस्था करण्यात यावी. याबाबतचे नियोजन करावे, प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये, अश्या सूचना खासदार ओमराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी कळंब-उस्मानाबाद चे आ. कैलास घाडगे-पाटील, उपविभागीय अधिकारी सौ अहिल्या गाठाळ मॅडम, जि.प जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे, ग्रामविकास अधिकारी श्री. राजगुरू, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कळंब शहरातील दत्तनगर, शिवाजीनगर भाग सील
कळंब शहरातील एक महसूल कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर शहरातील दत्तनगर, शिवाजीनगर भाग सील करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ

From around the web