Header Ads

“लॉकडाउन: सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा, गुन्हा दाखल.”


पोलीस ठाणे, तुळजापूर: महेश केशव नवगीरे, सोमनाथ नवलिंग कोल्हे, बाबुराव बब्रुवान यावलकर, नवनाथ भास्कर क्षिरसागर व अन्य्‍ 5 व्यक्ती सर्व रा. बारुळ, ता. तुळजापूर या सर्वांनी दि. 06.05.2020 रोजी बारुळ येथील चौकात एकत्र जमून महेश नवगीरे याचा वाढदिवस साजरा केला. अशा प्रकारे त्यांनी मा.जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करुन नाका- तोंडास मास्क न लावता एकत्र जमून मानवी जिवीत धोक्यात येईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन पोलीस पाटील- शिवाजी सगर यांच्या फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, म.पो.का. कलम- 135 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 07.05.2020 रोजी दाखल करण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: प्रमिला चंद्रकांत मर्डे रा. किलज, ता. तुळजापूर या कुटूंबीयांसह दि. 06.05.2020 रोजी 18.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी होत्या. यावेळी भाऊबंद- सुरेश शिवाजी मर्डे, महानंदा मर्डे, शिवाजी मर्डे, प्रविण सगर यांनी शेतातील ज्वारीच्या पिकाची मोडणी केल्याच्या कारणावरुन प्रमिला मर्डे यांच्या घरात घुसून त्यांच्यासह मुलगा- चेतन, मुलगी- अंजली यांना शिवीगाळ करुन, डोके जमीनीवर आपटुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रमिला मर्डे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.05.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: मनोज विलास कदम रा. मानेगोपाळ, ता. उमरगा यांना दि. 07.05.2020 रोजी 08.00 वा. सु. मौजे मानेगोपाळ येथे भाऊबंद- राहुल विठ्ठल कदम, सतीश कदम, नेताजी कदम यांनी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. मनोज कदम यांची आई भांडण सोडवण्यास आल्या असतां त्यांनापण धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: ज्ञानेश्वर विश्वनाथ नकाते रा. मुर्टा, ता. तुळजापूर यांच्यासह त्यांचा भावास दि. 08.05.2020 रोजी 09.30 वा. सु. मौजे मुर्टा येथील मारुती मंदीरा समोर पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावातीलच- प्रविण सुधाकर लोहार, सुधाकर लोहार या दोघा पिता- पुत्रांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर नकाते यांच्या फिर्यादीवरुन वरील पिता- पुत्रांवर गुन्हा दि. 08.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments