“विनापरवाना स्पोटक बाळगले, गुन्हा दाखल.”भुम: 1)सागर वनवे रा. आनंदवाडी, ता. भुम 2)कुंडलीक हांगे रा. सोनारी, ता. परंडा 3)मदन मरुमकर रा. त्रिंतज, ता. भुम 4)उमेश वनवे रा. बेदरवाडी, ता. भुम हे सर्व दि. 17.05.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे पाथ्रुड शिवारात भुसुरुंग स्फोट करण्याच्या उद्देशाने महिंद्रा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 6924 सह असलेल्या ट्रेलरमध्ये विनापरवाना, अवैधपणे 210 जिलेटीन कांड्या, 100 डिटोनेटर बाळगलेले असतांना  व सोबतच्या दुसऱ्या विनाक्रमांकाच्या स्वराज ट्रॅक्टर- ट्रेलरमध्ये कॉम्प्रेसर मशीनसह भुम पो.ठा. चे पो.नि. श्री. रामेश्वर खनाळ यांच्या पथकास आढळले. अशा मजकुराच्या पो.नि. श्री. रामेश्वर खनाळ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द भा.द.वि. कलम- 283 सह, भारतीय स्फोटक कायदा व नियम अंतर्गत गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार अड्ड्यावर छापा.”
पोलीस ठाणे, लोहारा: बंडु जाधव, रमेश जाधव, मोहन चव्हाण, रवि राठोड, धनराज जाधव सर्व रा. जेवळी (पुर्व), ता. लोहारा, अनिल बनसोडे, ईस्माईल शेख, सिध्देश्वर उपाशे, रविराज कारभारी, रोहीत कारभारी सर्व रा. जेवळी (उत्तर), धनराज सरकाळे रा. विलासपुर (पां), ता. लोहारा हे सर्व दि. 17.05.2020 रोजी बंडु जाधव यांच्या घराच्या पाठीमागे जिरट जुगार खेळतांना जुगाराचे साहित्यासह रोख 22,620/-रु. च्या मालासह पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 “अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.

1) तेजस म्हस्के व करण जाधव दोघे रा. आनंदनगर, उस्मानाबाद हे दोघे दि. 17.05.2020 रोजी उस्मानाबाद येथील कोहिनूर हॉटेलच्या शेजारील गाळ्यात अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 40 बाटल्या (किं.अं. 4,400/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळले.
2) दिनकर देवकर रा. मार्डी, ता. लोहारा हा दि. 17.05.2020 रोजी मार्डी ते तोरंबा रस्त्यालगत दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 5 ली. गावठी दारु (किं.अं. 600/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.
3) 1)बापु शिंदे रा. नांदुर, ता. केज 2)बाळु काळे रा. सात्रा, ता. बीड हे दोघे दि. 17.05.2020 रोजी फक्राबाद येथे एका मोटारसायकलवर अवैध गावठी दारुची वाहतूक करत असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळले. त्यांच्या ताब्यातील 5 ली. गावठी दारु (किं.अं. 450/-रु.) सह मो.सा. जप्त करण्यात आली आहे.

No comments