भूम : मामाचा भाच्याकडून खून
भूम - तालुक्यातील आरसोली येथे  एका भाच्याने जुन्या भांडणावरून मामाचा दगडाने ठेचून  खून केल्याची घटना घडली आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून भाच्यास पोलिसानी अटक केली आहे.


 विलास आबासाहेब गोयकर रा. आरसोली, ता. भुम याचा गावातीच मामा- बाबासाहेब शिवाजी वाघमोडे वय 46 वर्षे, यांच्या सोबत एक वार्षापुर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन मामा- बाबासाहेब वाघमोडे यांना विलास गोयकर याने मोटारसायकलवर दि. 21.05.2020 रोजी 16.00 वा. सु. भुम एम.आय.डी.सी. शिवारातील बाणगंगा नदी काठावर नेउन बाबासाहेब वाघमोडे यांना दगडाने मारुन जिवे ठार मारले आहे. अशा मजकुराच्या श्रीमती सुनंदा बाबासाहेब वाघमोडे (मयताची पत्नी) यांच्या फिर्यादीवरुन विलास गोयकर याच्याविरुध्द गुन्हा दि. 21.05.2020 रोजी नोंदवला आहे.


हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुशांत बाळु भोईटे रा. किलज, ता. तुळजापूर यांचा विहीरीत पोहतांना गावातीलच भाऊबंद- रणजीत भोईटे यांच्याशी वाद झाला होता. दि. 18.05.2020 रोजी 10.30 वा. गावातील भोईटे वस्ती येथे बाळु सिध्दु भोईटे यांनी मुलगा- सुशांत यास पोहताना पाण्यात बुडवण्याचा जाब रणजीत भोईटे यास विचारला. यावर रणजीत याने बाळु भोईटे यांना दगड मारुन, त्‍यांच्या डोक्यात लोखंडी गज मारुन जखमी केले. तसेच रणजीत सह रोहीत भोईटे, रागीणी, पिंडु भोईटे, आकाश भोईटे, रघुनाथ भोईटे यांनी बाळु भोईटे यांच्यासह मुलगी- धनश्री व पत्नी- आशा यांनाही शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. अशा मजकुराच्या बाळु भोईटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा दि. 21.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: अनिल शिवाजी राठोड व अक्षय संतोष राठोड दोघे रा. अंबेजवळगे तांडा हे दोघे दि. 13.05.2020 रोजी 10.30 वा. उस्मानाबाद येथील ॲपेक्स हॉस्पीटल समोरुन मोटारसायकलवरुन जात असतांना संजय चव्हाण, सतीष पवार दोघे रा. जहागीरदारवाडी तांडा व महेश जाधव, विशाल जाधव दोघे रा. अंबेजवळगे तांडा हे दोन ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0389 व  एम.एच. 25 ए 0410 ने तेथे आले. दोन्ही ऑटोरिक्षा मोटारसायकलला आडव्या लाउन त्यांनी अनिल व अक्षय यांना लोखंडी गज, व साखळीने  मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनिल राठोड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन नमुद चौघांविरुध्द गुन्हा दि. 22.05.2020 रोजी नोंदवला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

अवघड आहे.. कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही.