कळंब,तामलवाडी : दोन रस्ता अपघातांत, दोन मयतपोलीस ठाणे, तामलवाडी: हरीकृष्ण अरविंद भोसले वय 33 वर्षे, रा. अरवळी, ता. तुळजापूर हे दि. 07.05.2020 रोजी 13.30 वा. सु. मौजे अरवळी ते तुळजापूर कार क्र. एम.एच. 25 टी 1137 ही चालवत जात होते. दरम्यान नांदुरी शिवारातील रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 25 यु 0230 च्या अज्ञात चालकाने ट्रक चुकीच्या बाजूने निष्काळजीपणे चालवून हरीकृष्ण भोसले यांच्या कारला समोरुन धडक दिली. या अपघातात हरीकृष्ण भोसले हे मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता ट्रक चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या तात्या हरीबा भोसले रा. आरवळी ता. तुळजापूर यांच्या फिर्यादीवरुन वरील ट्रकच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 13.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: संतोष विठ्ठल सोनवणे रा. उमरी, ता. केज हे दि. 13.05.2020 रोजी 00.30 वा. सु. आंबेडकर चौक, कळंब येथे पायी चालत जात होते. दरम्यान बार्शी ते अंबेजोगाई जानाऱ्या ट्रक क्र. एम.एच. 18 एए 8590 च्या अज्ञात चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून संतोष सोनवणे यांना धडक दिली. या अपघातात संतोष सोनवणे हे मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या वसुदेव मच्छींद्र साळवे रा. हासेगाव (के), ता. कळंब यांच्या फिर्यादीवरुन वरील ट्रकच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 13.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments