Header Ads

उमरगा शहरात एक महिला कोरोना पॉजिटीव्हउस्मानाबाद  -  उमरगा शहरात एक महिला कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यत कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता १७ झाली आहे.. पैकी चार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.उमरगा शहरातील एस.टी. कॉलनी भागात ही महिला राहत असून, चार दिवसापूर्वी ती मुंबईहुन उमरगा शहरात आली  होती. तिला उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा  भाग आता प्रशासनाने सील केला आहे..

उमरगा शहरात यापूर्वी दोन रुग्ण सापडले होते, ते बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच लोहारा आणि परंडा शहरातील रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्ह्यात एकूण 13 कोविड पॉझिटिव्ह  रुग्णावर उपचार 

 जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 982 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 220, लोहारा 76, कळंब 166, वाशी 18, भूम 41, परंडा 85 अशा व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 840 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 34 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 92 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.

 आज दि.21/05/2020 पर्यंत एकुण 17 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हात आढळुन आले त्यापैकि 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले (उमरगा 3 व परंडा 1 ) सदयस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 13 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैदयकिय महाविदयाल सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे  तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4,  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे 1 असे एकुण 13 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत सदया त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

No comments