उमरगा : शेतजमिनीच्या वाटणीवरून एकाचा खूनउमरगा: शेतजमिनीच्या वाटणीवरून औराद, ता. उमरगा येथे एकाचा खून झाला असून, पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिगंबर गणपती दुधभाते वय 42 वर्षे, रा. औराद, ता. उमरगा यांचा शेतजमीन वाटण्यावरुन भाऊबंद- शेषेराव  दुधभाते व विनायक दुधभाते यांच्याशी वाद झाला होता. दि. 20.05.2020 रोजी 18.30 वा. सु. दिगंबर दुधभाते हे मुलगा- शिवकांत याच्यासह शेतातुन घराकडे परत येत होते. यावेळी पुतण्या- अक्षय शेषेराव दुधभाते हा गावातीलच मुकेश विनायक कांबळे व तीन अनोळखी पुरुष अशा 5 व्यक्तींनी एका कारने तेथे येउन त्यांनी काठ्यांनी शेषेराव दुधभाते यांना मारहाण सुरु केली.


हा प्रकार पाहुन गावकरी- सुशांत कारभारी, संतोष गायकवाड, शिवाजी गायकवाड, महादेव गायकवाड, यशवंत पवार या सर्वांनी मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला. गावातील लोक जमु लागल्याने मारहाण करणारे नमुद चौघे व्यक्ती सोबत आनलेल्या कारने पळून गेले.

जखमी असलेल्या शेषेराव दुधभाते यांचा शासकीय रुग्णालय, लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. अशा मजकुराच्या श्रीमती दैवता दिगंबर दुधभाते (मयताची पत्नी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अक्षय शेषेराव दुधभाते, मुकेश विनायक कांबळे व तीन अनोळखी पुरुष अशा 5 व्यक्तींविरुध्द खुनाचा गुन्हा पो.ठा. उमरगा येथे नोंदवला आहे.

No comments