पेट्रोलियम, ऊर्जा क्षेत्रासह ऑटोमोबाइल शेअर्समध्ये वृद्धी

 
पेट्रोलियम, ऊर्जा क्षेत्रासह ऑटोमोबाइल शेअर्समध्ये वृद्धी

मुंबई, १६ मे २०२०:  ट्रेडिंग सेशनमध्ये शुक्रवारी एस अँड पी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-५० ने शेवटच्या तासात सुधारणा केली, मात्र शेवटी या दोहोंमध्ये घसरण झाली. वेदान्ता, आरआयएल, हिंदुस्तान युनिलिव्हर यासारख्या स्टॉकच्या आधारे ही सुधारणा झाली. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगतले की शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेट्रोलियम, ऊर्जा क्षेत्रासह ऑटोमोबाइल शेअर्समध्ये वृद्धी दर्शवली पण बँकिंग सेक्टरच्या कमकुवत कामगिरीमुळे दोन्ही निर्देशांकावर परिणाम झाला.
ट्रेड मार्केटला धातूंचे प्रोत्साहन:
एसअँडपी ५०० इंडेक्समध्ये मेटल आणि एनर्जी सेक्टर्सनी जोरदार कामगिरी केली, मात्र इतर शेअर्सनी निराशा केली. टाटा स्टील अँड वेदान्ताने मेटल स्टॉक टिकवून ठेवला. टाटा स्टील लिमिटेडने २७३.१५ रुपये म्हणजेच ४.६० रुपयांची किंवा १.७१ टक्क्यांची वाढ घेतली. तर वेदान्ता लिमिटेड ९२.६० रुपयांवर म्हणजेच ३.४५ रुपयांची किंवा ३.८७% ची वृद्धी घेऊन थांबला.
पेट्रोलिअम आणि ऊर्जा क्षेत्राची उसळी:
आज सुरुवातीला ३११.१० रुपयांच्या घसरणीवर सुरु झालेल्या सरकार नियंत्रित ऑइल व गॅस कंपनी भारत पेट्रोलिअम कॉर्प लिमिटेडने बंद होताना वृद्धी घेतली. त्याने ३१७.८० रुपयांवर म्हणजेच ८.१० रुपये किंवा २.६२ % च्या वाढ घेतली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनेही लक्षवेधी वाढ घेतली. हा शेअर ७५.५० रुपयांवर बंद झाला. म्हणजेच ०.३५ रुपये किंवा ०.४७ टक्क्यांची वृद्धी झाली.
ऑटोमोबाइल क्षेत्रानेही नफा कमावला:
निफ्टी ऑटोने आज नकारात्मक चित्र दर्शवले तरीही, तसेच यातील लिस्टेड शेअर्सनी या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाल रंग दर्शवला तरीही बोच लिमिटेडच्या शेअरने १.०९ टक्क्यांनी वाढ दर्शवली. तो ९,६२० रुपयांवर बंद झाला. निफ्टी ऑटो ५७४५.७० अंकांवर बंद झाला. त्याने ५८.३५ अंक किंवा १.०१ टक्क्यांची घट नोंदवली. हेल्थकेअर सेक्टरमध्ये अपोलो हॉस्पिटलने दोन्ही निर्देशांकात पुरेशी वाढ दर्शवली. हा स्टॉक आज १२९०.१६ रुपये एवढ्या कमी किंमतीने सुरु झाला. मात्र लवकरच वृद्धी घेत १,३,५४.५५ रुपयांवर आला. या स्टॉकने ६०.१५ रुपये किंवा ४.६५ टक्क्यांची वाढ दर्शवली.
आयटी शेअर्समध्ये घसरण:
अमेरिकेत मुख्यालय असलेल्या गार्टनर इंक (ग्लोबल रिसर्च अँड अॅडव्हाजरी) फर्मने कोरोना विषाणूच्या महामारीमुळे आयटी क्षेत्र ८ टक्क्यांनी आकुंचन पावेल, असा अंदाज वर्तवल्यानंतर आयटी स्टॉक्सने प्रचंड विक्रीचा अनुभव घेतला. शुक्रवारी व्यापार संपताना एनएसई आयटी इंडेक्स ०.७३% किंवा ९७.३५ अंकांनी घसरून १३,१९६.३५ अंकांवर बंद झाला. एचसीएल टेक्नोलॉजीज लिमिटेडचे शेअर ५.२५ रुपये किंवा १.०१ टक्क्यांनी घसरुन ५१२.२० रुपयांवर बंद झाले.

From around the web