डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

 
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

मुंबई, १२ मे २०२०:  सोमवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १९ पैशांनी घसरला आणि ७५.७३ वर बंद झाला. अमेरिकेने चलन मजबूत केल्याने तसेच देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर त्याचा परिणाम झाला. ७५.५५ वर सुरु झालेला भारतीय रुपया नंतर कोसळला आणि अमेरिकन चलनाच्या तुलनेत ७५.७३ म्हणजेच १९ पैशांनी घसरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. सकारात्मक डोमेस्टिक इक्विटिजनी लोकल युनिटला पाठींबा दिला आणि सहभागींनी अर्थव्यवस्थेतील कोरोना व्हायरससंबंधी घटनांबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.

From around the web