संचारबंदीचे उल्लंघन तीघांना प्रत्येकी 1,000/-रु. दंड


पो.ठा. तामलवाडी: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर असतांनाही संचारबंदीचे उल्लंघन करुन फिरणाऱ्या 1)ब्रम्हदेव भाले 2)गौरव राऊत दोघे रा.काटी, ता.तुळजापूर, 3)रघुनाथ लिंगफोडे रा. सावरगांव, ता.तुळजापूर या तीघांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी लोकसेवकाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम- 188 च्या 3 स्वतंत्र गुन्ह्यांत दोषी ठरवून प्रत्येकी 1,000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.

संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर,
दुकाने उघडे ठेवली 6 गुन्हे दाखल.

उस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा आदेश आहे. असे असतांनाही जिल्ह्यात विविध ठिकाणी दि. 31.03.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता फिरत असणारे 1) नाना वसंत मोरे रा. गंजेवाडी, ता.तुळजापूर 2)गुरुनाथ कोंडे रा. तामलवाडी, ता.तुळजापूर यांचे विरुध्द तर, संचारबंदी उल्लंघन करुन मोटारसायकलवर रस्त्याने फिरणारा 3)देवानंद गीरी रा. येसवंडी, ता.वाशी, तसेच जनता कर्फ्युचे उल्‍लंघन करुन चिकन दुकान उघडे ठेवणारे 4)मारुती डोलारे 5) शिवाजी रसाळ दोघे रा. उस्मानाबाद, हॉटेल उघडे ठेवणारे 6) विजयकुमार भोसले रा. काजळा, ता.उस्मानाबाद या 6 व्यक्तींविरुध्द स्वतंत्र 6 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 31.03.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments