Header Ads

निलेगावची एक महिला विलगीकरण कक्षात

तुळजापूर ते अक्कलकोट सीमा सीलतुळजापूर -  कोरोना पॉझिटिव्ह वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या तुळजापूर तालुक्यातील निलेगाव एका महिलेला सोमवारी (ता. २७) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, अन्य तिघांनाही मंगळवारी (ता. २८) रुग्णालयात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चपळगाव (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निलेगाव येथील चार जण गेले होते. दरम्यान, चपळगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला त्यांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगत स्वॅब सोमवारी (ता. २७) तपासणीसाठी पाठवून तिला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस प्रशासनाच्या मदतीने संबंधित महिलेस तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, अन्य तिघांनाही मंगळवारी (ता. २८) रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंचला बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार निलेगाव येथील चौघे चपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या चौघांना रुग्णालयात आणण्यात येणार आहे.

त्यापैकी एका महिलेला सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास रूग्णवाहिकेतून तुळजापूर येथे आणले असून, तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अन्य तिघांचे स्वॅब मंगळवारी घेण्यात येणार आहेत. आज स्वॅब घेतलेल्या महिलेस येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी सोलापूर येथून आलेल्या चार जणांचे स्वॅब ही सोमवारी (ता. २७) घेण्यात आले आहेत. सोलापूर या रेडझोनमधून आलेले हे चौघे येथील विलगीकरण कक्षात दाखल आहेत.

तुळजापूर ते अक्कलकोट सीमा सील 
चपळगाव येथून आलेल्या निलेगाव (ता. तुळजापूर) येथील महिलेला प्रशासनाने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. दरम्यान, गावात प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. तसेच तुळजापूर ते अक्कलकोटच्या (निलेगावमार्गे) सीमा सील करण्यात आली आहे. तसेच चोख पोलिस बंदोबस्त तैनात असल्याचे निलेगाव येथील पदाधिकारी नूरखाँ सौदागर यांनी सांगितले.

अणदूर येथे तीन दिवस जनता कर्फ्यू 
 सोलापुरात कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या वाढली आहे. अणदूरचे सोलापूरशी व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उद्या २९, ३० एप्रिल आणि १ मे असे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

अणदूर येथे तीन दिवस जनता कर्फ्यू
Posted by Osmanabad Live on Monday, April 27, 2020

No comments