Header Ads

लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


नळदुर्ग: लॉकडाऊनच्या काळात पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना, सोलापूर जिल्ह्यातील दोन लोक उस्मानाबाद जिल्ह्यात आले असता, त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर लहुजी शक्ती सेनेचे  प्रदेशाध्यक्ष  सोमनाथ कांबळे ( रा. काटगाव) यावेळी आले आणि त्यांनी पोलिसांवर दबाब टाकून त्या लोकांना सोडून द्या म्हणू लागले. पोलिसांनी नकार देताच कांबळे यांनी पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, यावरून कांबळे याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अश्विन कांबळे दि. 26.04.2020 रोजी 22.030 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर खानापूर फाटा येथे कर्तव्य बजावत होते. यावेळी 1)सोमनाथ कांबळे 2) आकाश कांबळे 3)आप्पाराव कांबळे 4)सुर्यकांत घोडके 5)गंगाराम आनंदकर सर्व रा. मोतीलाल नगर, सोलापूर हे सर्व नाका- तोंडास मास्क न बांधता, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन फिरत होते. यावर पोलीस नाईक अश्विन कांबळे यांनी त्यांना हटकले असता वरील व्यक्तींनी त्यांना धक्काबुक्की करुन शिवागाळ केली. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाच्या (पोलीसाच्या) शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा केला. अशा मजकुराच्या पो.ना.- अश्विन कांबळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुद गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments