Header Ads

व्हाट्स अँप  ॲडमिनवर गुन्हे दाखल करणार - जिल्हाधिकारीउस्मानाबाद :- एक सप्ताहा पूर्वी मरकज मज्जित निजामुद्दीन दिल्ली येथील घटनेवर सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप (whatsapp Group)वर विविध प्रकारचे सांप्रदायिक भडकाऊ मेसेज,  संदेश हे हिंदू , मुस्लीम ग्रुप मध्ये प्रसारित होत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सांप्रदायिक घटना घडण्याची शक्यता  नाकारता येत नाही.जातीय स्वरुपाचे व्हाट्अप ग्रुप (whatsapp Group) वर धार्मीक,  सांप्रदायिक तेढ निर्माण करणारे मेसेज, संदेश पाठविले जाऊ शकतात त्यामुळे जिल्ह्या मध्ये कायदा  व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये समाजात तेढ निर्माण करणारे संदेश समाज माध्यमात प्रसारित केल्यास ॲडमिनवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत.

     जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्या करिता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना  महणून  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये  दिनांक 5 एप्रिल 2020 पासून उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील प्रमाणे आदेश लागू करीत आहे.

      उस्मानाबाद जिल्ह्यातील व्हाट्सअप ग्रुप (whatsapp Group) चे ॲडमिन त्याच्या  व्हाट्सअप ग्रुप (whatsapp Group)वर फक्त ॲडमिन हेच मेसेज ,संदेश पाठवू शकतील. वाट्सअप ग्रुप (whatsapp Group) चा  इतर कोणताही सदस्य व्हाट्सअप ग्रुप (whatsapp Group)वर मेसेज, संदेश पाठवू शकणार नाही. या नंतर व्हाट्सअप ग्रुप (whatsapp Group) वर कोणताही धर्म, धर्मगुरु, धार्मीक स्थळाबाबत मेसेज, संदेश किंवा असा कोणताही संदेश ज्यामुळे समाजामध्ये, धर्मां मध्ये तेढ निर्माण होऊ शकेल असे मेसेज संदेश प्रसारित करतील अशा व्हाट्सअप ग्रुप (whatsapp Group) चे ॲडमिन  हे गुन्ह्यास पात्र ठरतील याबाबत त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील.

 या नंतर जर व्हाट्सअप (whatsapp ) ट्विटर (Twitter), इंन्स्टाग्राम (instagram) वर कोणीही धर्म,धर्मगुरु,धार्मिक स्थळाबाबत मेसेज ,संदेश किंवा असा कोणताही संदेश ज्यामुळे समाजामध्ये, धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकेल असे मेसेज, संदेश प्रसारित करतील.व्हाट्सअप (whatsapp),ट्विटर (Twitter), इंन्स्टाग्राम(instagram)  वापर कर्ते हे गुन्ह्यास पात्र ठरतील याबाबत त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील.

 या नंतर जर फेस बुक ग्रुप पेज (facebook Group/page) वर कोणीही धर्म, धर्मगुरु, धार्मिक स्थळाबाबत मेसेज ,संदेश किंवा असा कोणता ही संदेश ज्यामूळे समाजामध्ये, धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकेल असे मेसेज,संदेश प्रसारित करतील तर अशा फेसबुक ग्रुप पेज फेसबुक पेज (facebook Group/page) चे ॲडमिन हे गुन्ह्यास पात्र ठरतील याबाबत याची व्यक्तिगत जबाबदारी राहील.

 व्हाट्सअप  (whatsapp ),ट्विटर (Twitter) ,इंन्स्टाग्राम(instagram )वर कोणासही कोरोना विषाणू (कोव्हीड-19) अनुषंगाने चुकीचा व वैज्ञानिक दृष्टीकोन नसलेला मेसेज, संदेश प्रसारित करता येणार नाही. अन्यथा उक्त नमूद मेसेज,संदेश प्रसारित करणाऱ्या व्हाट्सअप (whatsapp ),ट्विटर (Twitter), इंन्स्टाग्राम(instagram) वापर करते ॲडमिन गुन्ह्यास पात्र ठरतील याबाबत त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील.

 हे आदेश हे पूर्ण पणे प्रशासकीय कामकाजा करिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या व्हाट्सअप ग्रुप (whatsappGroup )ला लागू राहणार नाहीत,  असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

1 comment

कामाचे राहिले बाजुला said...

Gawagawat piyala pani nahi he bha ma.madamji faltugiri sodda ani kamache bga