आत्महत्येस प्रवृत्त केले, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, वाशी: श्रीमती सोनाली सुदर्शन शिंगटे रा. दहीफळ, ता. वाशी यांचा सुदर्शन शिंगटे (पती), लक्ष्मीबाई शिंगटे (सासु) या दोघांनी सुन सोनाली हीने माहेराहुन पैसे आणावेत. या कारणावरुन वेळोवेळी शारिरीक मानसिक छळ केला. या त्रासास कंटाळून दि. 28.04.2020 रोजी सोनाजी हिने विष प्राशन करुन आत्महत्या केली. अशा मजकुराच्या सुशिला लहु तजगदाळे रा. हिवरा, ता. भुम यांच्या तक्रारीवरुन वरील आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 306, 34 सह, हुंडा प्रतिबंधक कायदा कलम- 3, 4  अन्वये गुन्हा दि. 30.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 “मारहाण.”
पोलीस ठाणे, उमरगा: दि.29.04.2020 रोजी 11.00 वा. सु. मौजे कसगी येथील शेतात, ता. उमरगा येथे बंडाप्पा शिवशरणाप्पा कांते व अन्य 3 सहकारी सर्व रा. कसगी, ता. उमरगा यांचा शेतजमीन मोजणीच्या कारणावरुन भाऊबंद- सिध्दराम शिवलिंगप्पा कांते व अन्य 3 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने, चाकुने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उमरगा येथे दि. 29.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे, वाशी: झिंगा रावसाहेब शिंदे रा. दसमेगांव, ता. वाशी व त्यांची आई- शांताबाई शिंदे असे दोघे दि. 28.04.2020 रोजी 22.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर असतांना घरा शेजारील भाउबंद- ईश्वर अरुण शिंदे याने शेतजमीनीच्या व पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन त्या दोघांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या झिंगा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 29.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
उभे पिक जाळले, गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे, परंडा: सोमनाथ सोपान मुके, अर्चना सोमनाथ मुके, प्रतिक्षा सोमनाथ मुके तीघे रा. सिरसाव, ता. परंडा यांनी पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दि. 27.04.2020 रोजी 15.00 वा. सु. भाउबंद- अभिजीत महादेव मुके यांच्या मौजे सिरसाव शेत गट क्र. 502 मधील ऊसाचे पिक जाळुन अंदाजे 30,000/-रु. चे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या अभिजीत मुके यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतांवर गुन्हा दि. 29.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments