Header Ads

“संचारबंदी दरम्यान वाहनावर ग्रामपंचायतीच्या सही- शिक्क्याचे लेबल, गुन्हा दाखल.”पोलीस ठाणे, वाशी: सतिश सुब्राव भैराट वय 35 वर्षे, रा. शेलगांव, ता. वाशी यांनी त्यांच्या स्कार्पीओ क्र. एम.एच. 12 एच.आर. 4114 च्या समोरील काचेवर मौजे दहीफळ- शेलगांव कोरोना कक्ष अत्यावश्यक सेवा या नावाचे दहीफळ- शेलगांव ग्रामसेवक व सरपंच यांच्या सही- शिक्क्याचे लेबल लाउन प्रवास करत असतांना दि.07.04.2020 रोजी 14.30 वा. सु. वाशी येथील दुरध्वनी केद्रा जवळ पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळले. अशा प्रकारे सतिश भैराट यांनी त्यांच्या या कृती मुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होउ शकतो हे माहित असतांना देखील  शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन त्यांच्या विरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोव्हीड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये पो.ठा. वाशी येथे गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments