Header Ads

“डिझेल- पेट्रोल चोरीचा पर्दाफाश आरोपी अटकेत.”


पोलीस ठाणे, तामलवाडी: भारत पेट्रोलीयम व इंडीयन ऑईल या कंपन्यांचे इंधन वाहतुक करणारे टॅकर चालक- रमेश यादव, जयसिंग दवणे, भारत यादव, सितलाप्रसाद प्रजापती, सचिन माळी, रियाज इटकळे, शंकर आडगळे सर्व रा. सोलापूर यांनी आपापल्या ताब्यातील 7 टँकर दि. 27.04.2020 रोजी मौजे तामलवाडी, गट क्र. 389 मध्ये उभे केले. त्या टँकर मधील डिझेल-40 ली. व पेट्रोल- 10 ली. चोरले. हे चोरीचे इंधन राजु उल्हास पिरंगे रा. तामलवाडी, ता. तुळजापूर याने इतरांना स्वस्त दरात विक्री करण्याच्या उद्देशाने खरेदी केले. वरील इंधन चोरीचे पाईप व 7 ट्रक टँकर ताब्यात घेउन सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे. अशा प्रकारे वरील आठ जणांनी इंधन चोरी करुन  संबंधीत ऑईल कंपनीची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या सपोनि श्री. मजकुराच्या शदरचंद्र रोडगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: आण्णा राम लटके, शहाजी आण्णा लटके दोघे रा. राजुरी, ता. परंडा हे दोघे दि. 27.04.2020 रोजी 22.30 वा. खासापुरी धरण संपादीत उल्फा नदी पात्रात, राजुरी येथे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू (ट्रॅक्टर- ट्रॉली व वाळूसह किं.अं. 4,05,000/- रु. ) उत्खनन करुन चोरुन नेत असतांना मंडळ अधिकारी, जवळा (नि.)- श्री. संतोष खुळे यांना आढळले. अशा मजकुराच्या संतोष खुळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्यक्तींविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, वाशी: दि.27.04.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे रामकुंड येथील शेतात, ता. भुम येथे सुर्यभान रावसाहेब चंदनशिवे व अन्य 6 सहकारी यांचा शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन भाऊबंद- हरी विठ्ठल चंदनशिवे व अन्य 7 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने, कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. वाशी येथे दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


No comments