Header Ads

देशी दारूचे दुकान फोडणारा चोरटा मुद्देमालासह अटक  तुळजापूर - देशी दारूचे दुकान फोडून दारूची चोरी करणाऱ्या एका संशयित चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. ज्ञानेश्वर बब्रुवान पवार उर्फ ज्ञानू ( रा. हंगरगा पाटी ) असे या चोरट्याचे नाव आहे.

गोपाळनगर, तुळजापूर येथील देशी दारुच्या दुकानातील देशी दारुचे 20 बॉक्स (किं.अं. 41,800/-रु.) दि. 20.03.2020 ते 11.04.2020 या कालावधी दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्यावरुन पो.ठा. तुळजापूर गु.र.क्र. 148/2020 भा.दं.वि. कलम- 457, 380 अन्वये अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 11.04.2020 रोजी नोंदवण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात स्था.गु.शा. चे पो.नि.  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि  पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- मरलापल्ले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 14.04.2020 रोजी मौजे हंगरगा पाटी, तुळजापूर येथे छापा टाकून गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमाला पैकी देशी दारुचे 6 बॉक्स (किं.अं. 13,520/-रु.) सह गुन्ह्यात वापरलेली एचएफ डीलक्स मो.सा., व एक लोखंडी पाना (किं.अं. 50,200/-रु.) व संशयीत आरोपी- ज्ञानेश्वर बब्रुवान पवार उर्फ ज्ञानू रा. हंगरगा पाटी, तुळजापूर यास ताब्यात घेउन पुढील तपासकामी तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

No comments