Header Ads

रस्ता अपघात, एक मयत.


पोलीस ठाणे, तुळजापूर: महादेव बाबुराव शेंडगे वय 50 वर्षे, रा. धारुर, ता. उस्मानाबाद हे दि. 25.02.2020 रोजी 22.00 वा. सु. विश्वनाथ कॉर्नर, तुळजापूर येथील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी होंडा युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 8966 च्या अज्ञात चालकाने महादेव शेंडगे यांना पाठीमागुन धडक दिल्याने ते वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न ठेवता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत मो.सा. चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या भैरवनाथ महादेव शेंडगे (मयताचा मुलगा) यांच्या फिर्यादीवरुन वरील मो.सा. च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
मारहाण.”
पोलीस ठाणे, उमरगा: तानाजी शिवाजी सोलंकर रा. कोरेगाववाडी, ता. उमरगा हे कुटूंबासह दि. 26.04.2020 रोजी 17.00 वा. सु. मौजे कोरेगाववाडी शेत गट क्र. 3 मध्ये शेतात होते. यावेळी गावातील नातेवाईक- व्यंकट माधव माने, माया व्यंकट माने, लक्ष्मण माने, नागेश माने व अन्य तीन व्यक्ती यांनी बेकायदेशीर जमाव जमवून माया माने यांचा मालमत्तेतील हिस्सा का देण्याच्या कारणावरुन ‍शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठी, कम्बर पट्ट्याने मारहाण केली. अशा मजकुराच्या तानाजी सोलंकर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
चोरी.”
पोलीस ठाणे, आनंदनगर: उस्मानाबाद येथील ‘ईलेक्ट्रीकल्स & इरीगेटर्स’ दुकानाची भिंत अज्ञात चोरट्याने दि. 22.03.2020 ते 27.04.2020 या कालावधीत फोडून दुकानातील एन्को व शक्ती पंप 8 नग, टिल्लु कंपनीची विद्युत मोटर- 5 नग, 250 मी. कॉपर वायर, गार्डन पाईप- 25 बंडल, वेल्डींग मशिन व केबल (असा एकुण 98,000/- रु.) चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या दुकान मालक- दिलीप भाउसाहेब काळे रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, येरमाळा: एका विना नंबरच्या ट्रॅकटर च्या अनोळखी चालक दि. 28.04.2020 रोजी 11.40 वा. सु. मसोबाचीवाडी शिवारात त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर- ट्रॉलीमध्ये अंदाजे दिड ब्रास दगड (किं.अं. 1,500/- रु.) चोरटी वाहतुक करत असतांना तलाठी- जयंत पाचकुडवे यांना आढळला. त्यावर त्यांनी त्याला चौकशीकामी ट्रॅक्टर थांबवण्यास सांगीतले असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर वळवून घेतो असे म्हणुन रस्त्यालगतच्या शेतात दगड ओतून वाहनासह पळून गेला. अशा मजकुराच्या जयंत पाचकुडवे यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक- मालकाविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments