Header Ads

महंत तुकोजीबुवा यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल ( Video )

तुळजापूर -  लॉकडाऊनचे नियम तोडून वाढदिवस साजरा करणारे तुळजाभवानी देवस्थानचे मुख्य पुजारी व महंत तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह 6 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंत तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह 6  जणांनी वाढदिवस तर साजरा केला शिवाय  केक कापतानाचे व्हिडीओ बनवून ते त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह 6 जणांवर कलम 188, 269 व कोविड कायदा 11 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
देशासह  राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असून तो 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तरी देखील काही लोकांना याचं गांभीर्य नाही. काही लोक जमावबंदी असताना देखील गर्दी गोळा करुन वाढदिवस आणि इतर उत्साह साजरा करत आहेत.   

उस्मानाबाद जिल्ह्यात १२ एप्रिल पर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, उस्मानाबाद जिल्हा सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे. 
Posted by Osmanabad Live on Sunday, April 12, 2020

No comments