Header Ads

“ट्रॅक्टर-मळणीयंत्र अचानकपणे सुरु केल्याने महिलेचा मृत्यु, गुन्हा दाखल.”पोलीस ठाणे, तामलवाडी: बिभीषण मारुती काळे रा.काटी हे ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 6232 घेउन दि. 04.03.2020 रोजी 14.30 वा. सु. काटी, ता. तुळजापूर येथील अनिल काटीकर यांच्या शेतात मळणी साठी आले होते. यावेळी बिभीषण काळे याने मळणी यंत्र ट्रॅक्टरला जोडल्यावर अचानक चालू केले. त्यामुळे जवळच उभ्या असलेल्या सुनिता बलभिम काळे वय 45 वर्षे, रा. काटी, ता.तुळाजापूर यांच्या डोक्यास असलेली ओढणी ट्रॅक्टर- मळणीयंत्र जोडणाऱ्या शाफ्ट मध्ये अडकून -ओढली जाउन सुनिता यांच्या डोके शाफ्टवर जोरात आदळल्याने त्या गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या त्यांचे पती- बलभिम मारुती काळे यांनी अकस्मात मृत्यु प्रकरणाच्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दि. 03.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


  “मारहाण.”
पोलीस ठाणे, मुरुम: दत्तात्रय मुरलीधर कवटे रा. नळवाडी, ता.उमरगा यांना दि. 01.04.2020 रोजी 20.30 वा. सु. त्यांच्या घरा समोरील ‘कवठे किराणा दुकान’ समोर दुध घेण्याच्या कारणावरुन भाउबंद पांडु भालचंद्र कवटे, राजेंद्र कवटे, शुभम बंकट कवटे, अमोल कवटे यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर पांडु कवटे यांनी दत्तात्रय कवटे यांच्या डोक्यात हंटर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय कवटे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सिध्दनाथ जिवनराव माशाळकर रा.इटकळ, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून दि. 02.04.2020 रोजी 04.00 वा. चे दरम्यान घरातील सोन्याचे दागिने 30,000/-रु. चे, रोख रक्कम 15,000/- रु. असा एकुण 45,000/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सिध्दनाथ माशाळकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.No comments