Header Ads

“संचारबंदीचे उल्लंघन 11 व्यक्तींना प्रत्येकी 500/-रु. दंड.”पो.ठा. तुळजापूर: मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी पो.ठा. तुळजापूर गु.र.क्र. 132/2020 दाखल गुन्ह्यातील 11 व्यक्तींना संचारबंदी जाहीर असतांनाही संचार बंदीचे उल्लंघन करणे, लोकसेवकाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करणे. या प्रकरणी भा.दं.वि. कलम- 188 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून प्रत्येकी 500/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.

संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी 234 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या अशा वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार काल दि. 06.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर) पो.ठा.- 13 वाहने, तुळजापूर पो.ठा.- 12 वाहने, भुम पो.ठा.- 2 वाहने, तामलवाडी पो.ठा.- 7 वाहने, वाशी पो.ठा.- 3 वाहने अशी एकुण 37 वाहने ताब्यात घेतली आहेत.
तर आज दि. 07.04.2020 रोजी आनंदनगर पो.ठा.- 10 वाहने, उस्मानाबाद (ग्रामीण) पो.ठा.- 6 वाहने, तुळजापूर पो.ठा.- 80 वाहने, नळदुर्ग पो.ठा.- 5 वाहने, लोहारा पो.ठा.- 60 वाहने, कळंब पो.ठा.- 24 वाहने, भुम पो.ठा.- 6 वाहने, वाशी पो.ठा.- 6 वाहने अशी एकुण 197 वाहने (वृत्त लिहीपर्यत) ताब्यात घेतली असुन उर्वरीत कारवाई सुरु आहे.


संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर
उस्मानाबाद जिल्हा:  उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 06.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)आतुल दिलीप कदम 2)सय्यद मोहसीन महमंद गौस 3)ईर्शाद खौरोद्दीन पठाण 4)तबरेज महंमद पठाण 5)अमर राजेंद्र पेठे 6)गजानन दिलीप निकम सर्व रा.उस्मानाबाद, तर मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता भाजी विक्री करणारे 7)आदम मेहबुब शेख रा. मिल्ली कॉलनी, उस्मानाबाद, या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 7 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 6.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

तर आज दि.07.04.2020 रोजी तुळजापूर येथे हार्डवेअर सामान व सिमेंट विक्री करत असणारे 1)दिपक बाबुराव धोंगडे रा. तुळजापूर, तर मजुर जमवून स्वत:च्या घराचे बांधकाम करणारे 2)जावेद अकबर सय्यद रा. गांधीनगर, उस्मानाबाद अशा 2 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments