Header Ads

“क्वारंटाईन कक्षातून संशयीत पळाला, गुन्हा दाखल.”
पो.ठा. तुळजापूर: सोहेल रहमान सय्यद वय 40 वर्षे, रा. औरंगाबाद यास तुळजापूर उप जिल्हा रुग्णालयात कोरोना क्वारंटाईन कक्षात वैद्यकीय पथकाच्या निगरानीत ठेवण्यात आलेले होते. दि. 06.04.2020 रोजी पहाटे 04.30 वा. सु. तो पथकाची नजर चुकवून तेथून निघून गेला. अशा प्रकारे नमुद व्यक्तीने वैद्यकीय उपचारांना जाणीवपुर्वक, निष्काळजीपणे टाळून कोरोना संसर्ग पसरण्याच्या कारणास जबाबदार होण्याची कृती केली आहे. अशा मजकुराच्या डॉ. दिगंबर कमठाणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये गुन्हा दि. 06.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड करा

No comments