Header Ads

सलून आणि हॉटेल उघडण्यास परवानगी नाही...

सध्या हे सलून बंद आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या गृह  विभागाने आजपासून सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली  असली तरी त्यात सलून आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिलेली नाही, तसेच दारूची दुकानेही उघडण्यास परवानगी नाकारलेली आहे.

गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाले की, वस्तू विक्री करणारी दुकाने उघडता येऊ शकतात, परंतु सलून, सौंदर्य उपचार, यासारखी दुकाने उघडता येणार नाहीत. तसेच कोणतेही रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी नाही.

दिलासा : आजपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी

गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊन असलेली दुकाने आजपासून उघडण्यास काही अटीवर परवानगी देण्यात  आली आहे.  यात आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा समावेश आहे. या दुकानांमध्ये काम करणा्यांनी लॉकडाऊनसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले पाहिजे. पण शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी नाही.

आजपासून ही दुकानं सुरु होणार
 • ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने सुरु होतील
 • शहरी भागात एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडी राहतील
 • तर मार्केट एरियातली, मॉल्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहतील
 • ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्याही फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच डिलीव्हरी करु शकतात
 • लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आधीपासूनच आहे.
 • दुकाने केवळ 50 टक्के कर्मचार्‍यांसह आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.
हे मात्र बंदच राहणार
 • दारुची दुकाने बंदच राहतील
 • शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स अद्याप उघडणार नाहीत
 • कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही
 • महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने उघडणार नाहीत.
 • सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, थिम पार्क, थिएटर, बार बंद राहील.
 •  सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद


गृहमंत्रालयाने या अटी लादल्या आहेत

गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारने महापालिका आणि नगरपालिका हद्दीत येणार्‍या निवासी वसाहतींना लागून असलेली दुकाने व स्टँड अलोन दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीने गृहमंत्रालयानेही काही अटी घातल्या आहेत. अटींनुसार ..

१-सर्व दुकाने संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना अधिनियमांतर्गत नोंदविण्यात याव्यात.

2- केवळ अर्ध्या कर्मचारीच दुकानांमध्ये काम करू शकतील.

3- मुखवटा ( मास्क ) लावणे कर्मचार्‍यांना बंधनकारक असेल.

४.  दुकानदार आणि ग्राहकानेदेखील सोशल डिस्टन्सिंग ( शारीरिक अंतर) सारखे उपाय केले पाहिजेत.शाळेच्या पुस्तकांच्या दुकानात आधीपासून सूट

21 एप्रिल रोजी सरकारने आवश्यक पावले उचलून शालेय पुस्तकांची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. याव्यतिरिक्त, विद्युत पंखे विक्री करणाऱ्या  दुकाने देखील निर्बंधाच्या यादीतून काढून टाकण्यात आली. गृह मंत्रालयाने म्हटले होते की शहरी भागात स्थित ब्रेड फॅक्टरी आणि पीठ गिरणीही लॉकडाऊन दरम्यान काम सुरू करू शकतात. कोरोना व्हायरस लॉकडाउनचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले.

1 comment

Unknown said...

Sir foot wear shop open hoga na?