Header Ads

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 19 वाहने जप्त


उस्मानाबाद : लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 29.04.2020 रोजी कळंब- 3, तामलवाडी- 1, शहर वाहतुक शाखा- 15, अशी एकुण 19 वाहने ताब्यात घेतली आहेत.

लॉकडाउन: दि.29.4.2020 रोजी 578 पोलीस कारवायांत 1,57,400/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 315 कारवाया करुन 63,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 84 कारवाया करुन 42,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 145 कारवाया करुन 34,400/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 2 कारवाया करुन 2,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
5)कार- मोटारसायकलवर प्रवाशी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारसायकलवर फक्त चालक स्वत:, तर कार मध्ये चालकाशिवाय फक्त एक प्रवासी अशी मर्यादा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुध्द 32 कारवाया करुन 16,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.

No comments