चोरीच्या मोटारसायकलसह संशयीत ताब्यात


उस्मानाबाद (शहर) पो.ठा. हद्दीतून मोटारसायकल चोरीस गेल्यावरुन गु.र.क्र. 302/2014 प्रमाणे दाखल होता. गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. शेख यांच्या पथकातील पोउपनि श्री. खोडेवाड, पोहेकॉ- रोकडे, पोना- वाघमारे, पोकॉ- लाव्हरे-पाटील, सावंत यांच्या पथकाने संशयीत आरोपी- सुरेश चंदर काळे उर्फ परमेश्वर रा. जुना बस डेपो, पारधी पिढी, उस्मानाबाद यास गोपनीय माहितीच्या आधारे दि. 11.04.2020 रोजी ताब्यात घेउन चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायल (कि.अं.52,000/-) जप्त केली आहे. अधिक तपासकामी आरोपीस उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. 

चोरी.”
पोलीस ठाणे, कळंब: कळंब येथील देशी दारुच्या दुकानावरील पत्रा अज्ञात चोरट्याने दि. 20.03.2020 ते 10.04.2020 या दरम्यान उचकटून दुकानातील देशी दारुचे 115 बॉक्स, एक संगणक, रेकॉर्डीग डिव्हीआर, हार्ड डिस्क, राउटर व रोख रक्कम 7,394/- रु. (एकत्रीत 2,25,722/-रु.) चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या दुकान मालक- राजेंद्र थोरात यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 10.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अपत्य जन्म लपवला, गुन्हा दाखल.”

पोलीस ठाणे, तुळजापूर: मौजे काक्रंबा शिवारातील एका कोरड्या विहीरीत दि. 11.04.2020 रोजी 12.00 वा. एक नवजात पुरुष अर्भक मयत स्थितीत आढळले. यावरुन पोलीस पाटील- परमेश्वर खताळ यांच्या तक्रारीवरुन अपत्य जन्म लपविण्याचा प्रयत्न केल्या बद्दल अज्ञात आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 318 अन्वये गुन्हा दि. 11.04.2020 रोजी दाखल करण्यात आला आहे.

No comments