“संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, 14 गुन्हे दाखल.”


उस्मानाबाद जिल्हा:  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.09.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे सहा जण 1)सिध्दार्थ बसवंत सुर्यवंशी 2)रोहीत राजेंद्र निंबाळकर 3)पुष्कराज वाकडकर तीघे रा. उस्मानाबाद 4)भैरु नपसिंग इंगळे रा. माळकरंजा, ता.कळंब 5)उत्तरेश्वर जाधव 6)सोमनाथ पाटोळे दोघे रा. गोविंदपुर, ता.कळंब, तर शासनाच्या आदेशाचे अल्लंघन करुन परंडा येथे कापड दुकान, 5 जनरल स्टोअर्स दुकाने, स्टिल सेंटर अशी 7 दुकाने उघडे ठेवणारे अनुक्रमे 7)अज्जु रज्जाक डोंगरे 8)फरीद हन्नुरे 9)मकबुल हावरे 10)जितु जलाराम 11)सोहेल तुटके 12)नयुम करपुडे 13)जीमल बेसकट सर्व रा. परंडा, मा.जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने चालू ठेवण्याची निश्चित केलेली वेळ 07.00 ते 11.00 वा. पर्यंत असतांनाही मौजे माणकेश्वर, ता.भुम येथे ‘सोनाली किराणा’ दुकान 18.00 वा. उघडे ठेवनारे 7)रमेश शामराव अंधारे रा. माणकेश्वर, सलगरा (दि.), ता.तुळजापूर येथे किराणा दुकान उघडे ठेवणारे 8)अमर अनिल मुळे रा. सलगरा (दि.) या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये स्वतंत्र 8 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 09.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

तर दि.10.04.2020 रोजी आपल्या भाजी दुकानात ग्राहकांना सुरक्षीत अंतरावर उभे न करता गर्दी निर्माण करुन भाजी विक्री करणारे 1)रज्जाक बागवान 2)युवराज रायबान 3)सुभाष माळी 4)येतीराज रायबान 5)शंकर माळी सर्व रा. उस्मानाबाद, तर स्वत: च्या घरा समोर पानमसाला विकनारे 6)रियाज तांबोळी रा. कळंब या 6 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 6 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 10.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन काळात 870 वाहने जप्त, 
3,101 वाहनांवर कारवाईसह 7,03,200/-रु. तडजोड शुल्क वसूल

उस्मानाबाद जिल्हा: दि. 22.03.2020 पासुन लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरणाऱ्या व्यक्तींना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार आज पर्यंत 870 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर 3,101 वाहनांवर कारवाया करुन  एकुण 7,03,200/-रु. तडजोड शुल्क वसुल करण्यात आले आहे.

1 comment

Jivan Dolare said...

Kirana dukan varil karyvahibari kelli