Header Ads

“संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हे दाखल.”
उस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा- लॉकडाउनचा आदेश आहे.
               उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 04.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)प्रविण दत्तात्रय घावटे रा.बार्शी 2)अलताफ शब्बीर बागवान 3)मस्जिद शेख 4)निजाम शेख 5)आयुब अत्तार 6)युसूफ शेख 7)आब्बास शेख सर्व रा. येरमाळा, ता.कळंब, तर लॉकडाउनच्या काळात नाका- तोंडास मास्क न लावता इनोव्हा कार मध्ये फिरनारे 1)माधव राजाभाऊ भोसले 2)बालाजी औदुंबर नरटे 3)परमेश्वर मोहन रोहीले 4)अशोक केरबा कुंभार 5)श्रावण बाळु रोहीले सर्व रा. लासोना, ता.उस्मानाबाद या सर्वांविरुध्द दि. 04.04.2020 रोजी भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, मु.पो.का. कलम- 135 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
तर आज दि.05.04.2020 रोजी जनता कर्फ्यु अंमलात असतांनाही 1)महेश येरोळकर 2)बळीराम वाघमारे दोघे रा.जवळा (नि.), ता.परंडा सर्व मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरले. तर 3) जाकी पठाण रा.ढोकी, ता.उस्मानाबाद यांनी ढोकी येथे चौकात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करतांना आढळले या वरुन अशा एकुण 3 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी 71 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या अशा वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार काल दि. 04.04.2020 रोजी आनंदनगर पो.ठा.- 4 वाहने,  ग्रामीण पो.ठा.- 2 वाहने, तुळजापूर पो.ठा.- 20 वाहने, शिराढोण पो.ठा.- 4 वाहने, कळंब पो.ठा.- 3 वाहने, भुम पो.ठा.- 13 वाहने अशी एकुण 46 वाहने ताब्यात घेतली आहेत.
तर आज दि. 05.04.2020 रोजी आनंदनगर पो.ठा.- 2 वाहने, बेंबळी पो.ठा.- 10 वाहने, मुरुम पो.ठा.- 12 वाहने, भुम पो.ठा.- 1 वाहन अशी एकुण 25 वाहने (वृत्त लिहीपर्यत) ताब्यात घेतली असुन उर्वरीत कारवाई सुरु आहे.
ही वाहन जप्तीची कारवाई लॉकडाउन असे पर्यंत दररोज केली जाणार आहे. नागरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडून लॉकडाउनच्या उद्देशाला हरताळ फासु नये असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी केले आहे.

No comments