“गुटखा बाळगला गुन्हा दाखल.”


पोलीस ठाणे, ढोकी: व्यंकटेश रामलिंग सुरवसे रा. तडवळा, ता.उस्मानाबाद यांनी दि. 29.03.2020 रोजी तडवळा येथे प्रतिबंधीत गुटखा पाकीटे (किं.अं.2,420/-रु.) बाळगले असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला होता. त्याची खात्री करुन अन्नसुरक्षा अधिकारी, उस्मानाबाद यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 03.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
1) सुलोचना संजय काळे, आकुलाबाई अनिल काळे, रतन शामराव पवार तीघे रा. पारधी पिढी, उस्मानाबाद हे सर्व दि. 03.04.2020 रोजी स्वत:च्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना सुलोचना काळे यांच्या ताब्यात विदेशी दारुच्या 25 बाटल्या, 30 ली. गावठी दारु एकत्रीत कि.अं. 4,450/-रु.च्या मालासह तर आकुलाबाई काळे या अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना 60 ली. गावठी दारु व 28 बॅरल मध्ये भरलेला गावठी दारु निर्मीतीचा 5,600 ली. द्रव पदार्थासह एकुण किं.अं. 4,61,400/-रु. च्या मालासह व रतन पवार हे अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना 30 ली. गावठी दारु व 10 बॅरल मध्ये भरलेला गावठी दारु निर्मीतीचा 2,000 ली. द्रव पदार्थासह एकुण किं.अं. 1,65,500/- रु. च्या मालासह पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील तीन्ही आरोपीविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे स्वतंत्र 3 गुन्हे दि. 03.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
2) योगेश राजेंद्र देवकर, महेश देवकर, काशिनाथ दिगंबर देवकर तीघे रा. करवंजी, ता.लोहारा हे दि. 03.04.2020 रोजी मौजे करवंजी शिवारात देशी- विदेशी दारुच्या 269 बाटल्या कि.अं. 31,170/-रु. व रोख रक्कम 8,140/- रु. च्या मालाची मो.सा. ने अवैध वाहतुक करत असतांना स्था.गु.शा. यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. लोहारा येथे गुन्हा दि. 03.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
3) शेषेराव शेटीबा दंडगुले रा.मुळज, ता.उमरगा हे दि. 03.04.2020 रोजी मुळज शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना 40 ली. गावठी दारु (कि.अं. 2,100/-रु.) सह पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा. उमरगा येथे गुन्हा दि. 03.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
4) सुरेश तुकाराम मोटे, रा. गोंधळवाडी, ता.तुळजापूर हा सोबत एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने दि. 04.04.2020 रोजी मौजे धोत्रा ते देवकुरुळी रोडवर मो.सा. ने 20 ली. गावठी दारु (कि.अं. 1,000/-रु.) पाहुन नेत असतांना पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा तामलवाडी येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
5) सुधीर कवडे रा.वेताळनगर, तुळजापूर हा दि. 03.04.2020 रोजी बीडकर तलाव, तुळजापूर येथे अवैध दारुचा विक्री करत असतांना विदेशी दारुच्या 24 बाटल्या (कि.अं. 6,000/-रु.) सह पो.ठा. तुळजापूर यांच्या पथकास आढळुन आला. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा तुळजापूर येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
6) जनार्दन चव्हाण रा.होळी, ता.लोहारा हा दि. 04.04.2020 रोजी त्याच्या राहत्या घरा समोन अवैध दारुचा विक्री व्यवसाय करत असतांना 10 ली. गावठी दारु व 100 ली. गावठी दारु निर्मीती द्रव पदार्थ (एकुण कि.अं. 1,500/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा लोहारा येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments