Header Ads

क्वारंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हे दाखल


उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.28.04.2020 रोजी मौजे तांदुळवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)नितीन महादेव गोरे रा. तांदुळवाडी, ता. भुम. आणि होम क्वारंटाईन असतांनाही ग्रामपंचायत कार्यालय, वाठवडा येथे आदेशाचे उल्लंघन करुन निष्काळजीपणाची कृती करणारे दोघे पती- पत्नी 2)बळीराम नवनाथ गायकवाड 3)बालीका बळीराम गायकवाड रा. वाठवडा, ता. कळंब या सर्वांविरुध्द
            तसेच आज दि. 30.04.2020 रोजी शासनाच्या बंदी आदेश असतांनाही उमर मुहल्ला, उस्मानाबाद येथे केश कर्तनालय व्यवसायासाठी उघडे ठेउन ग्राहकांची गर्दी निर्माण करणारे दत्ता हरीभाऊ शिंदे रा. उमर मुहल्ला, उस्मानाबाद या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments