संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, 3 गुन्हे दाखल


उस्मानाबाद ;  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.11.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे चौघे 1)खंडु रामकिसन जाधवर 2)गोविंद रामहरी जाधवर दोघे रा. ताउगांव, ता.कळंब 3)अतिक रमजान मुंडे रा. शिराढोण, ता.कळंब 4)विनोद संदीपान चुगे रा.पिंपळा (बु.), ता.तुळजाजूर, तर मौजे ढेकरी शेत शिवारात वाढदिवस साजरा करण्यास जमलेले 5)महंत तुकोजी बुवा 6)विशाल रोचकरी 7)संजय पवार 8)महंत वाकोजीबुवा व अन्य तीन ईसम या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 11.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

किराणा दुकान चोरी सामानासह, अल्पवयीन ताब्यात.”
स्थानिक गुन्हे शाखा: कळंब पो.ठा. हद्दीतून दोन किराणा दुकानांतील किराणा माल चोरीस गेल्यावरुन अज्ञात आरोपींविरुध्द गु.र.क्र. 118 व 119 /2020 असे दोन गुन्हे दाखल होते. गुन्हा तपासात गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, थोरात पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- मार्लापल्ले यांच्या पथकाने चोरीस गेलेल्या किराणा साहित्यासह दोन विधीसंघर्ष ग्रस्त बालकांस (अल्पवयीन आरेापी) दि. 11.04.2020 रोजी ताब्यात घेउन अधिक तपासकामी आरोपीस कळंब पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. तर त्यांच्या अन्य सहकारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मारहाण.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: मकसुद सौदागर, हणमंत घंटे, स्वप्निल वाघोळे तीघे रा. निलेगाव, ता.तुळजापूर यांनी दि. 11.04.2020 रोजी 17.30 वा. सु. गावातील चिकन दुकानदार सादीक बाबु शेख यांना चिकन मागीतले. त्यावर सादीक यांनी दुकान बंद असल्याचे सांगीतले. त्या कारणावरुन वरील तीघांनी सादीक यांना व त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. त्यात सादीक यांची आई- खातुनबी यांचा उजवा हात मोडला. अशा मजकुराच्या सादीक शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 12.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, तुळजापूर: गोपाळनगर, तुळजापूर येथील देशी दारुच्या दुकानातील देशी दारुचे 20 बॉक्स (किं.अं. 41,800/-रु.) दि. 20.03.2020 ते 11.04.2020 या कालावधी दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या दुकान मालक- अनंत भारतराव घोडके रा.तुळजापूर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 11.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक.”
पोलीस ठाणे, उमरगा: विशाल बलभीम एरंडे रा. कुन्हाळी, ता. उमरगा हे दि. 11.04.2020 रोजी 15.00 वा. सु. कुन्हाळी येथील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी गावातीलच सुधाकर माधव भोगीले याने मो.सा. क. एम.एच. 25 एआर 6039 ही निष्काळजीपणे,  चुकीच्या दिशेने चालवून विशाल एरंडे यांना धडक दिली. या अपघातात विशाल यांच्या पायाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या विशाल एरंडे यांच्या फिर्यादीवरुन वरील मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 11.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments