Header Ads

चोरीच्या दोन गुन्ह्यांतील आरोपी मुद्देमालास अटकेत


स्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. शिराढोण गु.र.क्र. 29/2020 या गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल फोन व इनर्व्हटर, ग्राईंडर एकुण किं.अं. 4,500/- रु. च्या मुद्देमालासह आरोपी- अविनाश दिलीप भोसले रा. पाटोदा पारधी पिढी, ता. उस्मानाबाद यास दि. 28.04.2020 रोजी तर, पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 120/2020 या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, रोख रक्कम 21,000/- रु. व मनगटी घड्याळ अशा 45,000/- रु. च्या माल, व गुन्हा करण्यास वापरलेली मो.सा. सह आरोपी- 1)जितेंद्र प्रभु पवार 2)रवि लक्ष्मण पवार दोघे रा. तेर पारधी पिढी यांना दि. 29.04.2020 रोजी स्था.गु.शा. चे पोनि श्री दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

No comments