Header Ads

“जबरी चोरीतील आरोपी अटक, मुद्देमाल जप्त.”


स्थानिक गुन्हे शाखा (LCB): तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 16/2019 मधील चोरीस गेलेल्या एचएफ डिलक्स मोटारसायकल किं.अं. 30,000/- रु. सह आरोपी- 1)रवि टर्लीग्या पवार रा. उमरेगव्हाण, ता. उस्मानाबाद 2)राजा देविदास भोसले रा. तुळजापूर (तिर्थ) यांस स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोउपनि श्री. पांडुरंग माने, खोडेवाड, पोहेकॉ- जगताप, थोरात, काझी पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- मार्लापल्ले, सावंत, होळकर, कावरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. तामलवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 56 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 27.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 1, तुळजापूर- 15, कळंब- 14, परंडा- 11, शहर वाहतुक शाखा- 15, अशी एकुण 56 वाहने ताब्यात घेतली आहेत.

लॉकडाउन- पानटपरी चालू ठेवली, गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): प्रभाकर बनसोडे रा. अजिंठा नगर, उस्मानाबाद हा दि. 28.04.2020 रोजी 15.30 वा. सु. उस्मानाबाद येथे त्याच्या ताब्यातील पानटपरी उघडी ठेउन व्यवसाय करत असतांना उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

लॉकडाउन: छुप्या मार्गाने- विनापरवाना जिल्हा प्रवेश, 3 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद केल्या आहेत. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने आलेले 1)साहेल हसन इनामदार रा. रा. बलसूर, ता. उमरगा हा दि. 19.04.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे बलसूर येथे आला. तर, 2)हुल शिवाजी बाबर 3)महादेव लक्ष्मण बाबर 4)परमेश्वर विनायक धोपरे तीघे रा. धानुरी, ता. लोहारा हे तीघे दि. 21.04.2020 ते 25.04.2020 या कालावधीत बाहेर गावाहुन मौजे धानुरी गावात आले. तर 5)बळीराम रामदास जाधव रा. दगडधानोरा, ता. उमरगा हे बाहेर गावाहून दि. 17.04.2020 रोजी दगडधानोरा गावी आले. तसेच 6)तोसीफ इक्बाल शेख 7)अनिकेत गायकवाड दोघे रा. जामखेड हे दि. 27.04.2020 रोजी सोनगिरी, ता. परंडा येथे आले. अशा रितीने वरील सर्वांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या लॉकडाउन संबंधी विविध आदेशांचे- कायद्याचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील- ग्रामसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्यक्तीविरुध्द स्वतंत्र 4 गुन्हे भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments